TRENDING:

Friday Theatre Releases : बॉलिवूड, टॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत, हा शुक्रवार थिएटर गाजवणार 'या' 10 फिल्म; आजच बुक करा तिकिट

Last Updated:
Friday Theatre Releases : 14 नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर मोठा क्लॅश होणार आहे. तब्बल 10 चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहेत. या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड, साऊथ ते हॉलिवूडचे चित्रपट रिलीज होणार आहेत.
advertisement
1/10
Friday Theatre Releases : हा शुक्रवार थिएटर गाजवणार 'या' 10 फिल्म
दे दे प्यार दे 2 (De De Pyaar De 2) : अजय देवगन आणि रकुलप्रीत सिंह यांचा 'दे दे प्यार दे 2' हा चित्रपट 14 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात आर. माधवन, इशिता दत्ता, मीजान जाफीर, जावेद जाफरी आणि गौतमी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. अंशुल शर्माने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
advertisement
2/10
कांथा (Kaantha) : दुलकर सलमान अभिनीत 'कांथा' हा चित्रपट 14 नोव्हेंबर 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सेल्वमणि सेल्वराज यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
advertisement
3/10
काल त्रिघोरी (Kaal Trighori) : 'काल त्रिघोरी' ही सुपरनॅचरल हॉरर फिल्म 14 नोव्हेंबरला प्रदर्शित होईल. आदित्य श्रीवास्तव स्टार या चित्रपटाच्या माध्यमातून अरबाज खान तब्बल 6 वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.
advertisement
4/10
द रनिंग मॅन (The Running Man) : 'द रनिंग मॅन' हा एक हॉलिवूड डायस्टोपियन अॅक्शन थ्रिलर फिल्म आहे. एडगर राइट दिग्दर्शित हा चित्रपट 14 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
advertisement
5/10
गाथा वैभव (Gatha Vaibhava) : पुनर्जन्मावर आधारित 'गाथा वैभव' हा चित्रपट 14 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सुनील कुमार दिग्दर्शित या चित्रपटात आशिका रंगनाथ आणि एसएएस दुष्यंत मुख्य भूमिकेत आहेत.
advertisement
6/10
दाऊद (Dawood) : 'दाऊद' हा तामिळ चित्रपट 14 नोव्हेंबरला रिलीज होण्यास सज्ज आहे. दथो राधारवी, लिंगा, साई धीना, अभिषेक, जयकुमार आणि शरा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
7/10
स्कूल लाइफ (School Life) : 'स्कूल लाइफ' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा पुलिवेंदुला महेश यांनी सांभाळली आहे. सावित्री कृष्णा, मुडे वरुण नायक आणि शन्नू शेख अशा कलाकारांची मांदियाळी असलेला हा चित्रपट 14 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
advertisement
8/10
लव्ह ओटीपी (Love OTP) : अनीश तेजेश्वर दिग्दर्शित 'लव्ह ओटीपी' हा चित्रपट 14 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनीश तेजेश्वर, जाह्नविका कलाकेरी आणि राजीव कनकला या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
9/10
कुमकी 2 : 'कुमकी' या तामिळ चित्रपटाचा 'कुमकी 2' हा सीक्वल आहे. प्रभू सोलोमन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात मथियाझगन, अर्जुन दास आणि श्रीता राव मुख्य भूमिकेत आहेत.
advertisement
10/10
बेबी गर्ल (Baby Girl) : 'बेबी गर्ल' हा मल्याळम सस्पेन्स थ्रिलर चित्रपट याच शुक्रवारी रिलीज होईल. अरुण वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात कुंचाको बोबन आणि निविन पॉली हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Friday Theatre Releases : बॉलिवूड, टॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत, हा शुक्रवार थिएटर गाजवणार 'या' 10 फिल्म; आजच बुक करा तिकिट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल