Suraj Chavan : निवडणुकीच्या धामधुमीत सूरज चव्हाणने घेतली अजित दादांची भेट घेतली, कारण काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Ajit Pawar - Suraj Chavan Meet : महाराष्ट्रात निवडणुकीची धामधुम सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बिग बॉस मराठी 5 विनर सूरज चव्हाण यांची भेट चर्चेत आली आहे. काय होतं त्यांच्या भेटीचं कारण?
advertisement
1/8

बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाणने नुकतीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवार आणि सूरज चव्हाण यांची भेट चर्चेत आली आहे.
advertisement
2/8
अजित पवार यांनी पोस्ट लिहित सूरज चव्हाणने घेतलेल्या सदिच्छा भेटीचे फोटो पोस्ट केलेत. त्यांनी सूरजला शुभेच्छा दिल्यात. दोघांच्या भेटीमागचं नेमकं कारण काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
advertisement
3/8
अजित पवार यांनी सूरज चव्हाणला बारामतीमध्ये त्याचं नवीन घर बांधून दिलं. घर बांधत असताना त्याची पाहणी करण्यासाठीही दादा पोहोचेले होते.
advertisement
4/8
सूरज चव्हाणचं बारामतीमधील घर बनून तयार झालं असून लवकरच घराची वास्तू शांती देखील पार पडणार आहे. दरम्यान सूरज चव्हाणने अजित पवारांची सदिच्छा भेटच घेत त्यांच्याकडे समाधान व्यक्त केलं.
advertisement
5/8
अजित पवार यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, "बारामतीचा सुपुत्र आणि बिग बॉस मराठी विजेता सुरज चव्हाण यानं आज माझी सदिच्छा भेट घेतली. त्याच्या नवीन घराचं बांधकाम उत्तमरित्या पार पडत असून त्याबद्दल त्यानं माझ्याकडे समाधान व्यक्त केलं. यावेळी सुरजला पुढील वाटचालीसाठी, आयुष्यातील नव्या टप्प्यासाठी शुभेच्छा दिल्या."
advertisement
6/8
अजित पवार यांची भेट घेताना सूरज चव्हाण अत्यंत आनंदी दिसला. अजित पवार यांनी सूरज चव्हाणचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
advertisement
7/8
सूरज चव्हाणच्या घरी सध्या लगीन घाई आहे. येत्या 29 नोव्हेंबरला सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकणार आहे. सूरज त्याच्या मामाची मुलीसोबत लग्न करतोय.
advertisement
8/8
सूरज चव्हाणने अजित पवारांची भेट घेत त्यांना नव्या घराच्या पूजेचं आणि लग्नाचंही आमंत्रण दिल्याचं म्हटलं जात आहे. सूरज चव्हाणच्या लग्नाला अजित पवार हजेरी लावणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Suraj Chavan : निवडणुकीच्या धामधुमीत सूरज चव्हाणने घेतली अजित दादांची भेट घेतली, कारण काय?