Girija Oak Blue Saree : फुकटची साडी अन् लाखोंचे व्ह्यूज, ज्या साडीमुळे नॅशनल क्रश झाली गिरीजा ओक ती तिची नव्हतीच, मग कुणाची?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Girija Oak Blue Saree : अभिनेत्री गिरीजा ओक ज्या निळ्या साडीमुळे नॅशनल क्रश झाली ती साडी तिची नव्हतीच. मग कुणाची होती? गिरीजाने स्वत:च सांगितलं त्या साडीमागचं सीक्रेट.
advertisement
1/8

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक एका रात्रीत नॅशनल क्रश झाली. गिरीजा ओकला तिच्या एका साडीनं जगभरात लोकप्रियता मिळवून दिली. गिरीजाची ती निळी साडी देशभरात चर्चेत आली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का गिरीजाच्या या निळ्या साडीशी अभिनेत्री प्रिया बापटशी खास कनेक्शन आहे. कदाचित प्रियामुळे गिरीजा ओक ब्लू साडीमुळे चर्चेत आली.
advertisement
2/8
गिरीजा ओकने एका मुलाखतीत निळी साडी नेसली होती. तिचं नैसर्गिक सौंदर्य, तिच्या चेहऱ्यावरच तेज आणि तिच्या स्वभावात असलेला तो गोड, अल्लडपणा या सगळ्यामुळे ती प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाली. त्यात तिनं नेसलेली निळी साडी सोन्याहून पिवळी ठरली.
advertisement
3/8
अभिनेत्री गिरीजा ओकला साडी नेसायला प्रचंड आवडते. साडी तिचं प्रेम आहे. तिच्या जवळपास 400 हून अधिक साड्यांचं कलेक्शन आहे. देशातील प्रत्येक राज्याच्या कानाकोपऱ्यातील साड्या तिच्याकडे आहेत.
advertisement
4/8
पण गिरीजानं नेसलेली निळी साडी काही तिच्या साड्यांच्या कलेक्शनमधील नव्हती. प्रियाने नसलेली आकाशा निळ्या रंगाची लीनन कपड्यातील होतीय सावेंची या ब्रँडकडून तिनं ही साडी घेतली होती. सावेंची हा ब्रँड अभिनेत्री प्रिया बापट आणि तिच्या बहिणीचा आहे.
advertisement
5/8
नुकत्याच एका मुलाखतीत गिरीजानं तिच्याकडे असलेल्या साड्यांचं कलेक्शन सर्वांना दाखवलं. तिच्या साड्या दाखवता दाखवता गिरीजाने तिच्या निळ्या साडीमागची गोष्टही सांगितली. गिरीजानं ती निळी ठरवून घातली होती का? ती तिच्या आवडीच्या कलेक्शनमधील होती का? असा प्रश्न विचारण्यात आला.
advertisement
6/8
विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत गिरीजा म्हणाली, "असं काही नव्हतं. प्रिया बापट आणि तिच्या बहिणीचा ब्रँड आहे सावेंची. मी तिला फोन केला की साडी हवीये, मी वापरून तुला परत करेन, कोलाबरेशनमध्ये पोस्ट करूया. "
advertisement
7/8
"प्रियाच्या बहिणीने श्वेताने मला खूप साऱ्या साड्या पाठवल्या. त्यातील ही साडी मी नेसली. मी त्यांच्या आणखी बऱ्याच साड्या नेसल्या होत्या. पण आता ही वाली इतकी व्हायरल होईल, प्रत्येक ठिकाणी दिसले असं आम्हाला वाटलं नव्हतं."
advertisement
8/8
गिरीजानं ही साडी विकत घेतली नसली तरी तिचं या साडीशी खास नातं निर्माण झालं. गिरीजा म्हणाली, "मी श्वेताला म्हटलं, मी ही साडी काही दिवसांसाठी ठेवून घेऊ, या साडीशी माझी थोडी अटॅचमेन्ट झाली आहे. ती मला म्हणाली, हो ठेव, ही तुझीच साडी आहे. ही तुझ्यासाठी गिफ्ट आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Girija Oak Blue Saree : फुकटची साडी अन् लाखोंचे व्ह्यूज, ज्या साडीमुळे नॅशनल क्रश झाली गिरीजा ओक ती तिची नव्हतीच, मग कुणाची?