TRENDING:

HBD Tulip Joshi : बॉलिवूडमध्ये ठरली सुपरफ्लॉप; आता ज्योतिष बनून लोकांचं भविष्य पाहतेय 'ही' अभिनेत्री

Last Updated:
Happy Birthday Tulip Joshi : 'मेरे यार की शादी है' मधून चित्रपटसृष्टीत पॉल ठेवलेली अभिनेत्री म्हणजे ट्युलिप जोशी. तिने यानंतर अनेक चित्रपटांमध्येही काम केले. पण ती आपली ओळख बनवू शकली नाही. त्यानंतर हळूहळू काम मिळणं बंद झालं. तिने आता चित्रपटसृष्टीला कायमचा रामराम ठोकून नवीन व्यवसाय सुरु केला आहे. आज या अभिनेत्रीचा 43 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने जाणून घेउया तिच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी
advertisement
1/8
बॉलिवूडमध्ये ठरली सुपरफ्लॉप; आता ज्योतिष बनून लोकांचं भविष्य पाहतेय ही अभिनेत्री
आपल्या पहिल्याच चित्रपटातून आपल्या सौंदर्याने आणि निरागसपणाने लोकांना भुरळ पाडणारी ट्यूलिप जोशी. तिने केवळ हिंदीच नाही तर तमिळ तेलगू, कन्नड, मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे.
advertisement
2/8
जेव्हा ती बॉलिवूडमध्ये आली तेव्हा तिला मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळाले, परंतु तरीही ती कमाल दाखवू शकली नाही. तिची कारकीर्द फ्लॉप ठरली.
advertisement
3/8
ट्यूलिप गुजराती कुटुंबातील आहे. 2000 मध्ये तिने मिस इंडिया स्पर्धेतही भाग घेतला होता, पण पुढे जाऊ शकली नाही. त्यांनी जमनाबाई नरसी स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आणि नंतर मेजरिंग फूड सायन्स आणि केमिस्ट्रीमध्ये पदवी प्राप्त केली.
advertisement
4/8
बॉलीवूडमध्ये अयशस्वी झाल्यानंतर, ट्यूलिपने 6 वर्षे भारतीय सैन्यात कमिशनर्ड ऑफिसर म्हणून काम केलेल्या कॅप्टन विनोद नायर यांच्याशी लग्न केले हे अनेकांना माहीत नाही.
advertisement
5/8
विनोद नायर त्यांच्या 'प्राइड ऑफ लायन्स' या कादंबरीमुळे चर्चेत होते. विनोद 1989 ते 1995 पर्यंत भारतीय सैन्यात राहिले. जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ लाइव्ह ऑपरेशनमध्ये असलेल्या विनोदने अनेक आव्हानात्मक कामे केली.
advertisement
6/8
रिपोर्टवर विश्वास ठेवला तर, पती-पत्नी दोघेही आता किमाया नावाच्या कंपनीचे मालक आहेत, ज्याची 700 कोटी रुपयांची उलाढाल आहे. एक व्यावसायिक महिला असण्याव्यतिरिक्त, ट्यूलिप एक वैदिक ज्योतिषी म्हणून देखील ओळखली जाते आणि स्वतःला ध्यानात गुंतवून घेते.
advertisement
7/8
अलीकडे, तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लोकांना तिच्याकडून वैदिक सल्ला घेण्याची विनंती केली होती.
advertisement
8/8
तिने तिच्या पोस्टमध्ये, ''मी ट्यूलिप जोशी एक अभिनेत्री आणि वैदिक ज्योतिषी आहे. ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून मी लोकांना त्यांचे नातेसंबंध, करिअर, आरोग्य अशा अनेक समस्यांवर सल्ला देते.'' असा खुलासा केला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
HBD Tulip Joshi : बॉलिवूडमध्ये ठरली सुपरफ्लॉप; आता ज्योतिष बनून लोकांचं भविष्य पाहतेय 'ही' अभिनेत्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल