Dharmendra : धर्मेंद्र यांच्या मृत्यूनंतर पूर्णपणे खचल्या हेमा मालिनी, आठवणीत पहिल्यांदाच शेअर केले दोघांचे खास क्षण, Unseen Photo
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Hema Malini - Dharmendra Unseen : धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. धर्मेंद्र यांच्याबरोबरचा 45 वर्षांचा संसार एका क्षणात त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. त्यांनी पहिल्यांदाच धर्मेंद्र यांच्यासोबतचे काही अनसीन फोटो चाहत्यांबरोबर शेअर केलेत.
advertisement
1/8

अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी गुप्त ठेवण्यात आली होती. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी धर्मेंद्र यांच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली आहे.
advertisement
2/8
धर्मेंद्र यांचं निधन झाल्यानंतर देओल कुटुंबातील कोणीच याबद्दल अधिकृत भाष्य केलं नव्हतं. अखेर धर्मेंद्र यांच्या निधनाच्या चार दिवसांनी अभिनेत्री आणि त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
3/8
अभिनेत्री हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनानंतर भावुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टसहीत त्यांनी धर्मेंद्र यांच्याबरोबरच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
advertisement
4/8
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी तब्बल 45 वर्ष संसार केला. 2 मे 1980 साली त्यांनी लग्न केलं. हेमा मालिनी यांचं धर्मेंद्र यांच्याबरोबर दुसरं लग्न होतं. दोघांच्या लग्नानंतर खूप गदारोळ झाला होता.
advertisement
5/8
हेमा मालिनी यांनी विवाहित तसंच चार मुलांचे पिता असलेल्या धर्मेंद्र यांच्याबरोबर नेटानं संसार केला आणि तब्बल 45 वर्ष टिकवला. त्यांचं प्रेम शेवटपर्यंच अबाधित राहिलं.
advertisement
6/8
धर्मेंद्र यांच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी हेमा मालिनी यांनी त्यांच्याबरोबरचे काही अनसीन फोटो शेअर केलेत. 'वर्षानुवर्षांची साथ, आमच्यासाठी कायम खास असणारे क्षण… काही अविस्मरणीय आठवणी…' असं म्हणत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याबरोबरचे फोटो शेअर केलेत.
advertisement
7/8
यातील काही फोटो हे मुलींच्या लग्नातील आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे आहेत. आहाना आणि इशा यांच्याबरोबर दोघांनी घालवलेले सुंदर क्षणही या फोटोंमध्ये दिसत आहेत.
advertisement
8/8
हेमा मालिनी या उत्तम भरतनाट्यम नर्तिका आहेत. सुरुवातीला धर्मेंद्र यांना त्यांचं नृत्य करणं आवडत नव्हतं. पण काही वर्षांनी त्यांनी त्यांच्या नृत्यावरही प्रेम केलं. हेमा यांच्या पाठीशी धर्मेंद्र कायम उभे होते याचं पुरावा देणारा फोटो या सगळ्या फोटोंमधील सर्वात लक्षवेधी फोटो आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या मृत्यूनंतर पूर्णपणे खचल्या हेमा मालिनी, आठवणीत पहिल्यांदाच शेअर केले दोघांचे खास क्षण, Unseen Photo