नाकातून रक्तस्त्राव, 5 गंभीर आजारांशी झुंज, अखेर अभिनेत्रीने केली कमाल, ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही झालेले थक्क
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीने 5 गंभीर आजाराशी यशस्वी झुंज दिली आहे. अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन थक्क करणारं होतं.
advertisement
1/6

प्रसिद्ध अभिनेत्री तसेच 'बिग बॉस 13'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्रीने फॅट टू फिट होत सर्वांनाच थक्क केलं. फिटनेस जर्नीमध्ये अभिनेत्रीला मोठा संघर्ष करावा लागला. अखेर पाच गंभीर आजारांशी झुंज देत तिने आपलं पाच किलो वजन कमी केलं.
advertisement
2/6
'बिग बॉस 13' हा सीझन खूप गाजला. शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला व्यतिरिक्त पारस छाबडा, आसिम रियाज आणि माहिरा शर्मा यांचीही खूप चर्चा झाली. या सीझनमध्ये एक वाइल्ड कार्ड एंट्रीही झाली होती. शोमध्ये येताच या स्पर्धकाने धुमाकूळ घातला होता. ती घरात येताच शहनाज गिलशी भिडली होती. दोघांच्या भांडणात शहनाज गिलला अश्रू अनावर झाले होते. नंतर तिच्यावरच आसिम रियाज फिदा झाला आणि घरातच त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली.
advertisement
3/6
हिमांशी खुराना एकेकाळी चबी गर्ल होती. पण नंतर फॅट टू फिट ट्रान्सफॉर्मेशन करत तिने सर्वांना आश्चर्यचकित केले. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर हिमांशी खुराना स्वत:ला एवढी फिट बनवू शकली आहे. यादरम्यान अनेक आव्हानांवर तिने मात केली.
advertisement
4/6
हिमांशी खुरानाला पाच गंभीर आजारांचा सामना करावा लागला होता. तिला ऑटोइम्यून डिसीज, अॅन्झायटी, थायरॉईड, वारंवार नाकातून होणारा रक्तस्त्राव आणि हृदयाची समस्या होती. हिमांशी उपचारादरम्यान डॉक्टरांसमोर रडायची.
advertisement
5/6
हिमांशी खुराना तीन वर्षांपासून स्वत:वर काम करत होती. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती प्रयत्नशील होती. त्यामुळेच गंभीर समस्यांशी झुंज देत तिला फिट होता आलं. तिचा हा प्रवास रातोरात झालेला नव्हाता. तिच्या या प्रवासात तिची डॉक्टर मैत्रीण कधीच कंटाळली नाही. उलट हिमांशीला तिचं ध्येय गाठण्यात पाठिंबा देत राहिली.
advertisement
6/6
हिमांशी खुरानाचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आज अभिनेत्री आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण तिच्या फोटोवर चाहत्यांच्या नेहमीच सकारात्मक कमेंट पाहायला मिळतात. तू आधीही सुंदर होतीस, आता तर आणखी दिसतेस, तू जे केलं आहेस ते सोपं नाही, तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, अशा कमेंट्स हिंमाशी खुरानाच्या फोटोंवर चाहते करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नाकातून रक्तस्त्राव, 5 गंभीर आजारांशी झुंज, अखेर अभिनेत्रीने केली कमाल, ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही झालेले थक्क