TRENDING:

'मी लालबागची, सगळे राजे आमचे', हृता दुर्गुळेचं स्टेटमेन्ट चर्चेत

Last Updated:
Hruta Durgule : मराळमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे लालबागकर आहे. नुकतंच एका व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने याबाबत भाष्य केलं आहे.
advertisement
1/7
'मी लालबागची, सगळे राजे आमचे',  हृता दुर्गुळेचं स्टेटमेन्ट चर्चेत
महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाणारी मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री हृता दुर्गुळे लालबागची आहे. मुंबईतील लालबाग परिसरात लहानाची मोठी झालेल्या हृताचं गणेशोत्सवावर विशेष प्रेम आहे.
advertisement
2/7
अभिजात मराठी ओटीटीसोबत बोलताना हृताने मी लालबागची मुंबई असल्याचं सांगितलं आहे. यावेळी हृताला प्रश्न विचारण्यात आला की, आम्ही असं ऐकलंय की तू लालबागची मुलगी आहेस. या प्रश्नाचं उत्तर देत हृता म्हणाली,"हो. मी लालबागची मुलगी आहे. ब्रान इन ब्रॉटअप इन लालबाग".
advertisement
3/7
हृता म्हणाली,"आमचं एकत्र कुटुंब होतं. आई-बाबा, सगळे काका एकत्रच राहत होते. पुढे सगळ्यांना मुलं झाल्यानंतर मग आम्ही वेगळे राहायला लागलो. मी, माझा भाऊ आणि आई-वडील माझ्या सातवीपर्यंत लालबागमध्ये राहत होतो. आज जिथे अशोक टॉवर आहे बरोबर तिथेच खाली आम्ही राहत होतो".
advertisement
4/7
लालबागमध्ये राहिली असल्याने एमडी कॉलेज, लाबबाग, गणेशगल्ली हे खूप जवळचं आहे. तेजुकाया वगैरे सगळे राजे आमचे आहेत. गणपतीत या परिसरात एक वेगळाच माहोल असायचा. दिवसभर आवाज सुरू असे. एकंदरीत क्रेझी वातावरण होतं. त्यामुळे माझ्यासाठी गणेशोत्सव खूप जवळचा, असल्याचं यावेळी हृता म्हणाली.
advertisement
5/7
हृता पुढे म्हणाली,"माझ्यात थोडं लालबागचं आहे. जे मी 'टाइमपास 3' या चित्रपटात वापरलं. माझं बालपण लालबागमध्ये गेलं आहे". हृता दुर्गुळेने पुढे रुईया कॉलेजमधून शिक्षण घेतलं. आज मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये हृताचा समावेश होतो.
advertisement
6/7
हृता दुर्गुळे 'दुर्वा','फुलपाखरू','मन उडु उडु झालं' या छोट्या पडद्यावरील मालिकेंच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली आहे. 'फुलपाखरू' मालिकेतील 'वैदेही' या भूमिकेने ती अवघ्या महाराष्ट्राची क्रश झाली.
advertisement
7/7
हृताने 'अनन्या' या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. काही दिवसांपूर्वीच 'आरपार' हा तिचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 'सिंगिंग स्टार' या कार्यक्रमाचं तिने होस्टिंग केलं. आता हृताच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी लालबागची, सगळे राजे आमचे', हृता दुर्गुळेचं स्टेटमेन्ट चर्चेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल