Isha Keskar Serial Exit : ईशा केसकरचा 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेला रामराम? नवी हिरोईन येताच जुनी चालली सोडून
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Isha Keskar Serial Exit Buzz : लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतून ईशा केसकरची एक्झिटची चर्चा रंगली आहे. मालिकेचं कथानक नव्या वळणावर आहे.
advertisement
1/8

काही दिवसांआधी अभिनेत्री तेजश्री प्रधान वीण दोघांतली ही तुटेना ही मालिका सोडणार आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. तेजश्री मालिका सोडणार अशा चर्चा रंगताच चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान तेजश्रीनं पोस्ट शेअर करत या चर्चा अफवा असल्याचं सांगितलं.
advertisement
2/8
तेजश्रीनंतर आता स्टार प्रवाहची प्रसिद्ध नायिका देखील मालिका सोडतेय अशा चर्चा रंगल्या आहेत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील मुख्य नायिका ईशा केसकरची मालिकेतून एक्झिट होणार आहे अशा चर्चा रंगल्या आहेत. काय आहे या चर्चांमागचं कारण?
advertisement
3/8
लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा नवा अध्याय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राहुल आणि रोहिणी यांचा पर्दाफाश करायला गेलेल्या कलाचा रस्त्यात अपघात होतो आणि याच वेळी सुकन्या या नव्या पात्राची मालिकेत एन्ट्री दाखवण्यात आली आहे.
advertisement
4/8
सुकन्याचं चांदेकरांच्या घराशी काहीतरी खास कनेक्शन आहे. पण ही सुकन्या कोण हे अद्याप समोर आलेलं नाही. याच नोट मालिकेची स्टोरी बदलणार असल्याचं दिसतंय.
advertisement
5/8
कलाचा मालिकेत अपघात होतो. त्यानंतर सुकन्या देखील हॉस्पिटलमध्ये असल्याचं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं. सुकन्या म्हणजेच अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर हिने मालिकेत एन्ट्री घेतली आहे.
advertisement
6/8
मालिकेचा नवा अध्याय म्हणजेच ईशा केसकर आता मालिकेत दिसणार नाही, तिच्या ऐवजी नक्षत्रा मेढेकर तिची जागा घेणार अशा चर्चा सुरू झाल्या आहे. ईशा केसकरची मालिकेतून एक्झिट होतेय अशा चर्चा सुरू होताच तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
7/8
अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरसोबत मालिकेचा नवा अध्याय सुरू होतोय. अशातच अद्वैतची आई सरोज चांदेकर म्हणजेच अभिनेत्री पल्लवी पटवर्धन यांनीही एक व्हिडीओ शेअर केला आहे.
advertisement
8/8
"आमच्या लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत नवा अध्याय सुरू होतोय. कथानक वेगळं वळण घेतंय. तुम्ही पाहिलं असेल एक नवा चेहरा मालिकेच्या कुटुंबात सहभागी होतोय." या व्हिडीओनंतरही ईशा केसकर मालिका सोडणार या चर्चांना आणखी दुजोरा मिळाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Isha Keskar Serial Exit : ईशा केसकरचा 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेला रामराम? नवी हिरोईन येताच जुनी चालली सोडून