TRENDING:

'60 वर्षांच्या हिरोने रोमान्स केलेला चालतो, पण...' इंडस्ट्रीच्या डबल स्टँडर्ड्सवर संतापली प्रसिद्ध अभिनेत्री

Last Updated:
बॉलिवूडमध्ये जेव्हा एखादा अभिनेता साठी ओलांडतो, तेव्हा तो मोठ्या दिमाखात पडद्यावर २२ वर्षांच्या नायिकेसोबत रोमान्स करताना दिसतो. मात्र, अभिनेत्रींच्या बाबतीत मात्र वयाची गणितं लगेच बदलतात.
advertisement
1/7
'60 वर्षांच्या हिरोने रोमान्स केलेला चालतो, पण...' प्रसिद्ध अभिनेत्री संतापली
बॉलिवूडमध्ये जेव्हा एखादा अभिनेता साठी ओलांडतो, तेव्हा तो मोठ्या दिमाखात पडद्यावर २२ वर्षांच्या नायिकेसोबत रोमान्स करताना दिसतो. मात्र, अभिनेत्रींच्या बाबतीत मात्र वयाची गणितं लगेच बदलतात.
advertisement
2/7
याच डबल स्टँडर्डवर आता प्रसिद्ध अभिनेत्री मोना सिंह हिने जोरदार प्रहार केला आहे. मनोरंजन विश्वात महिलांना एक्सपायरी डेट असते, असा समज रुढ झाला आहे, अशा शब्दांत मोनाने आपली नाराजी व्यक्त केली असून, या पुरुषप्रधान मानसिकतेवर बोट ठेवलं आहे.
advertisement
3/7
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर २' मुळे चर्चेत असलेली मोना सिंह आता नेटफ्लिक्सच्या 'कोहरा' सीझन २ मध्ये एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. या निमित्ताने एका मुलाखतीदरम्यान तिने इंडस्ट्रीतील भेदभाव मांडला.
advertisement
4/7
ती म्हणाली, "फक्त याच इंडस्ट्रीत असं का होतं की अभिनेत्रींच्या वयाची मर्यादा ठरवली जाते? पुरुष ६० वर्षांचे झाले तरी ते रोमँटिक हिरो म्हणून पडद्यावर मिरवू शकतात, मग महिलांनाच का विशिष्ट वयानंतर बाजूला सारलं जातं? हे दोन वेगवेगळे निकष का?"
advertisement
5/7
मोनाने नेहमीच लीक पेक्षा हटके भूमिकांना प्राधान्य दिलं आहे. 'जस्सी जैसी कोई नही' पासून सुरू झालेला तिचा प्रवास आज एका वेगळ्या वळणावर आहे. वयाबद्दल बोलताना ती म्हणाली, "मी स्वतः ४० वर्षांची असताना पडद्यावर ५० किंवा ६० वर्षांच्या महिलेची भूमिका करायलाही मागे हटत नाही. माझ्यासाठी भूमिकेची ताकद महत्त्वाची आहे, माझं दिसणं किंवा माझं वय नाही. जर एखादं कॅरेक्टर मला चॅलेंज देत असेल, तर मी ते आनंदाने स्वीकारते."
advertisement
6/7
'कोहरा'च्या पहिल्या सीझनने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. आता दुसऱ्या सीझनमध्ये मोना सिंह 'धनवंत कौर' या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. एका महिलेच्या हत्येचा तपास करताना स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील दु:ख कसं पेलते, हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. तिच्यासोबत बरुण सोबती, रणविजय सिंघा आणि अनुराग अरोरा असे दिग्गज कलाकारही दिसणार आहेत.
advertisement
7/7
पंजाबच्या कडाक्याच्या थंडीत आणि धुयक्याच्या पार्श्वभूमीवर चित्रीत झालेली ही मर्डर मिस्ट्री ११ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. मोनाने या प्रोजेक्टला तिच्या करिअरमधील एक सन्मानजनक संधी म्हटलं आहे. सुदीप शर्मा लिखित या मालिकेकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'60 वर्षांच्या हिरोने रोमान्स केलेला चालतो, पण...' इंडस्ट्रीच्या डबल स्टँडर्ड्सवर संतापली प्रसिद्ध अभिनेत्री
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल