TRENDING:

माधुरी दीक्षितचा हिरो! एका फ्लॉपनं दिवाळं काढलं, बायकोसोबत टाकला असा डाव; बनला 'बडा' स्टार

Last Updated:
Bollywood Star Net worth :  या अभिनेत्याने माधुरी दीक्षितसोबत अनेक लक्षात राहतील असे चित्रपट दिले. तो आज बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत स्टार्सपैकी एक आहे. परंतु 2000 च्या दशकात त्याचा एक चित्रपट फ्लॉप झाला आणि अभिनेता मागे पडला.  त्याचे गरिबीचे दिवस सुरू झाले पण त्याच्या एका निर्णयाने त्याचं नशीब पुन्हा उजळलं. 
advertisement
1/8
माधुरी दीक्षितचा हिरो, एका फ्लॉपनं दिवाळं काढलं; बायकोसोबत टाकला असा डाव अन्...
80 च्या दशकात एक तरुण मुंबईच्या चाळीतून बाहेर पडला आणि बॉलिवूडचा फेमस अभिनेता झाला. त्याने प्रसिद्धीसोबतच भरपूर संपत्तीही मिळवली. त्याने एकामागून एक हिट चित्रपट दिले आणि प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केलं. पण 90 च्या दशकात शाहरुख खान, सलमान खानसारखे नवीन कलाकार इतके लोकप्रिय झाले की त्याला साइड रोल करावे लागले. त्याने चित्रपट निर्मितीमध्ये हात आजमावला.
advertisement
2/8
या अभिनेत्याने 'कर्मा', 'त्रिदेव' सारखे हिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी माधुरी दीक्षितसोबत 'राम लखन', 'साजन' सारखे चित्रपट केले आहेत. 2000 च्या दशकाच्या मध्यापर्यंत, अभिनेता बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत स्टार्समध्ये गणला जात असे.
advertisement
3/8
आपण बोलत आहोत तो अभिनेता म्हणजे जॅकी श्रॉफ जे आजही चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. ते अनेकदा सहाय्यक भूमिकांमध्ये दिसतात. 'बूम' चित्रपटाच्या अपयशानंतर जॅकीने त्यांच्या गरिबीबद्दल बोलले होते.  परंतु त्यांनी वाईट काळ अतिशय हुशारीने हाताळला. 1994 मध्ये भारत सरकारने एक नवीन आर्थिक धोरण जाहीर केले. ज्यामुळे परदेशी कंपन्यांनी भारतीय केबल टेलिव्हिजन बाजारात प्रवेश केला.
advertisement
4/8
जॅकी आणि त्यांची पत्नी आयेशा यांनी सरकारच्या आर्थिक धोरणाचा फायदा घेतला आणि सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनला भारतात काम करण्यास मदत केली. त्यात मोठी गुंतवणूक केली.
advertisement
5/8
आयशा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की,  "कॉर्पोरेट स्ट्रक्चरशी माझी पहिलीच भेट होती तीही सोनीसोबत. आमचा 7 जणांचा ग्रुप होता. माझे पती जॅकीच्या इमेजमुळे आम्हाला प्रसिद्धी मिळाली. आमच्याकडे एक बँकर, एक टीव्ही माणूस आणि एक कॉम्प्युटप एक्सपर्ट होता. प्रत्येकाची स्वतःची खासियत होती."
advertisement
6/8
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन सुरुवातीला जॅकी श्रॉफ आणि त्यांच्या ग्रुपला बोर्डात समाविष्ट करण्याच्या बाजूने नव्हते कारण त्यांना मोठी गुंतवणूक हवी होती. पण जॅकी श्रॉफने सोनी लीडरसाठी एक भव्य पार्टी आयोजित करून त्यांना पटवून दिले. ज्यामध्ये बॉलिवूडमधील मोठे नाव उपस्थित होते.
advertisement
7/8
जॅकीची पत्नी आयशा पुढे म्हणाली, "पार्टी सकाळी 6 वाजता संपली आणि लॉस एंजेलिसहून आलेल्या बॉसने सांगितले, आम्ही या ग्रुपसोबत करार करत आहोत. आम्ही दुसऱ्याच दिवशी कागदपत्रांवर सह्या केली." या डीलमधून जॅकीला मोठा नफा झाला.
advertisement
8/8
जेव्हा आयशा श्रॉफला विचारण्यात आले की तिला किती नफा झाला, तेव्हा ती म्हणाली, "जर मी कॉन्सेप्टद्वारे डील स्पष्ट केली तर त्या वेळी 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 100 कोटी रुपयांचा परतावा मिळाला होता." जॅकीच्या कुटुंबाने नफ्यातून चित्रपटांव्यतिरिक्त त्यांचे व्यवसाय साम्राज्य उभारले. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, आज अभिनेत्याची एकूण संपत्ती सुमारे 400 कोटी रुपये आहे. स्पोर्ट्स लीग आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री व्यतिरिक्त, त्याने इतर अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे. जॅकी श्रॉफ अलीकडेच 'हाऊसफुल 5', 'गुड बॅड अग्ली' आणि 'तन्वी द ग्रेट' मध्ये दिसले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
माधुरी दीक्षितचा हिरो! एका फ्लॉपनं दिवाळं काढलं, बायकोसोबत टाकला असा डाव; बनला 'बडा' स्टार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल