TRENDING:

'मला तुझ्या बायकोशी लग्न करायचंय', गायकाने मित्राकडे मागितलेला त्याच्या पत्नीचा हात, जरा जास्तच फिल्मी आहे Love Story

Last Updated:
या प्रसिद्ध गायकाची लव्ह स्टोरी ऐकल्यावर तुम्हीही हेच म्हणाल की, असं कोण करतं! हा गायक आपल्या मित्राकडे त्याच्या पत्नीचा हात मागायला गेला होता. त्याने तिच्याबरोबर लग्नही केलं. मग पुढे काय घडलं? तुम्हीच वाचा.
advertisement
1/8
गायकाने मित्राकडे मागितलेला त्याच्या पत्नीचा हात, जास्तच फिल्मी आहे Love Story
गझलचे बादशाह आणि प्रेमासाठी धाडसी निर्णय घेणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक जगजीत सिंग. त्यांची गाणी तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी होती. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले. ऐकून आश्चर्य वाटेल पण जगजीत यांनी स्वत:च्या मित्राच्या बायकोबरोबर लग्न केलं होतं. त्यांची लव्ह स्टोरी जरा जास्तच फिल्मी आहे.
advertisement
2/8
गझल गायनाला मेहफिलींपासून सामान्य माणसांच्या घरापर्यंत पोहोचवणारे जगजीत सिंह हे केवळ महान गायक नव्हते तर आपल्या खऱ्या आयुष्यातही ते खूप धाडसी होते. पंजाबमधून आलेल्या जगजीत यांनी सामाजिक बंधने झुगारली आणि स्वत:च्या अटींवर स्वत:चं आयुष्य जगले.
advertisement
3/8
चित्रा सिंग असं जगजीत सिंग यांच्या पत्नीचं नाव आहे. जगजीत यांच्याशी लग्न झालं तेव्हा चित्रा या आधीच विवाहित होत्या आणि मुलाच्या आईही होत्या. "ना उमर की सीमा हो, ना जनम का हो बंधन..." या त्यांच्या प्रेमगीताच्या ओळी त्यांच्या आयुष्यात तंतोतंत लागू होतात.
advertisement
4/8
चित्रा सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांची पहिली भेट 1968 मध्ये स्टुडिओमध्ये झाली होती. तेव्हा चित्रा तिच्या वैवाहिक आयुष्यातून बाहेर आल्या होत्या. त्या प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेत होत्या. सुरुवातीला जगजीतचा आवाज ऐकून तिने त्याच्यासोबत गाण्यास नकार दिला होता.
advertisement
5/8
या काळात जगजीत सिंग यांचं चित्रावर प्रेम जढलं आणि ते दिवसेंदिवस वाढत गेलं. एका रिपोर्टनुसार त्यांनी चित्रा यांच्या नवऱ्याकडे जाऊन सरळ "मला तुमच्या पत्नीशी लग्न करायचं आहे", असं सांगितलं होतं. हे ऐकून सगळेच शॉक झाले होते.
advertisement
6/8
जगजीत आणि चित्रा यांनी 1969 मध्ये लग्न केलं. त्यांना विवेक सिंह हा मुलगा झआला. त्यांच्या लग्न करण्याच्या निर्णयाला कुटुंबीयांनी कधीच मान्यता दिली नाही. एक मजेशीर गोष्ट म्हणजे, चित्रा या जगजीत यांना पप्पा म्हणायच्या आणि जगजीत त्यांना मम्मी म्हणायचे.
advertisement
7/8
सर्व काही सुरळीत चाललं होतं आणि जुलै 1990 मध्ये त्यांच्या आयुष्यात मोठं वादळ आहे. त्यांचा मुलगा विवेकचा कार अपघातात मृत्यू झाला. वयाच्या 21 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. चित्राने त्यानंतर गाणं बंद केलं. "माझा घसा स्वतःच बंद झाला होता", असं त्या म्हणाल्या होत्या.
advertisement
8/8
सप्टेंबर 2011 मध्ये जगजीत सिंग यांना ब्रेन हॅमरेज झाला. उपचार सुरु असतानाच 10 ऑक्टोबर 2011 रोजी त्यांचे निधन झाले. गझल जगतातल्या या अनमोल रत्नाने या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून न निघणारी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मला तुझ्या बायकोशी लग्न करायचंय', गायकाने मित्राकडे मागितलेला त्याच्या पत्नीचा हात, जरा जास्तच फिल्मी आहे Love Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल