स्वतःचे नग्न फोटो विकले, पैशांसाठी केली देहविक्री; आता अभिनेत्रीचा यू-टर्न, संबंधांसाठी मेसेज करण्याऱ्यांना खडसावलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Bold Actress: बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्डनेससाठी आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आहे.
advertisement
1/8

मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या बेधडक स्वभावासाठी आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शर्लिन चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आहे. ग्लॅमरच्या दुनियेतील अनेक कलाकारांना पैशांसाठी कसे तडजोडी कराव्या लागतात, यावर अनेकदा चर्चा झाली आहे.
advertisement
2/8
शर्लिनने तिच्या आयुष्यातील एका सीक्रेट गोष्टीचा थेट खुलासा करत, देहविक्रीसाठी तिला सतत मेसेज करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत संदेश दिला आहे.
advertisement
3/8
शर्लिन चोप्राने अनेकवेळा तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत उघडपणे पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. शर्लिनने सांगितले की, तिच्या अधिकृत ईमेल आयडीवर आणि ट्विटर अकाउंटवर अनेक पुरुष पैसे देऊन शरीरसंबंध ठेवण्यासाठी संपर्क साधतात आणि ऑफर देतात.
advertisement
4/8
अशा सतत येणाऱ्या मेसेजेसमुळे संतापलेल्या शर्लिनने थेट कबूल केले होते, "मी आधी पैशांसाठी अनेक पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवले होते." तिच्या या धाडसी वक्तव्यामुळे इंडस्ट्रीमध्ये एकच गोंधळ उडाला होता.
advertisement
5/8
शर्लिन चोप्राचे नाव केवळ पेड सेक्सशीच नव्हे, तर अमेरिकेतील प्रसिद्ध 'प्लेबॉय' मासिकाला नग्न फोटो विकल्याच्या वादाशीही जोडले गेले होते. मात्र, आता ती या जुन्या कामापासून दूर झाली आहे.
advertisement
6/8
सध्या संपर्क साधणाऱ्यांना उद्देशून शर्लिन म्हणाली, "मी तुम्हा सर्वांची निराशा केल्याबद्दल माफी मागते. मला पूर्वी अनेकदा पेड सेक्ससाठी संपर्क साधण्यात आला होता, पण आता मी सांगू इच्छिते की, जे लोक आजही माझ्याशी संबंध ठेवण्यासाठी मेसेज करत आहेत, त्यांनी हे लक्षात घ्यावे की मी ते काम आता सोडले आहे. आता मला ते काम करण्यात रस नाही."
advertisement
7/8
काही दिवसांपूर्वीच तिने आपले ब्रेस्ट इम्प्लांट्स काढल्याचेही सांगितले होते, ज्यानंतर तिने आपल्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
8/8
शर्लिन चोप्राने 'टाईमपास' चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने 'बिग बॉस ३' आणि 'स्प्लिट्सव्हिला' सारख्या रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला होता. तिच्या या स्पष्ट भूमिकेमुळे पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
स्वतःचे नग्न फोटो विकले, पैशांसाठी केली देहविक्री; आता अभिनेत्रीचा यू-टर्न, संबंधांसाठी मेसेज करण्याऱ्यांना खडसावलं