TRENDING:

65 कोटींचं घर अन् महागड्या गाड्यांचा ताफा; 27 व्या वर्षी प्रचंड लक्झरी आयुष्य जगते 'ही' स्टारकिड

Last Updated:
आजकालचे अनेक स्टार्स केवळ चित्रपटांतून मोठी कमाई करतात. करिअर फ्लॉप असलं तरी ते स्टार्स प्रचंड लक्झरी आयुष्य जगतात. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशाच एका स्टार किड अभिनेत्रीविषयी सांगणार आहोत जी असेच पैसे कमावत लक्झरी आयुष्य जगते.
advertisement
1/9
65 कोटींचं घर अन् महागड्या गाड्या; प्रचंड लक्झरी आयुष्य जगते ही स्टारकिड
आम्ही ज्या स्टार किडविषयी तुम्हाला सांगणार आहोत ती दुसरी कोणी नसून जान्हवी कपूर आहे. जान्हवी केवळ बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री बनली नाही तर ती आलिशान जीवनशैली जगते.
advertisement
2/9
जान्हवी कपूरने 2018 मध्ये 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आज जान्हवी कपूरची एकूण संपत्ती तब्बल 82 कोटी रुपये आहे. ती तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी 5-10 कोटी रुपये फी घेते.
advertisement
3/9
जान्हवी कपूर तिचे वडील बोनी कपूर आणि बहीण खुशी कपूरसोबत बांद्रा या मुंबईच्या पॉश भागात राहते. एवढंच नाही तर तिने कुबेलिस्क या आलिशान इमारतीत डुप्लेक्स खरेदी केलं होतं. या डुप्लेक्सची किंमत तब्बल 65 कोटी रुपये आहे.
advertisement
4/9
जान्हवीच्या या डुप्लेक्समध्ये एक खाजगी स्विमिंग पूल आणि ओपन किचन सोबत बार एरिया आणि एक मोठी बाग देखील आहे.
advertisement
5/9
एवढंच नाही तर तिचं चेन्नईमध्ये 1.5 एकर जागेवर घर आहे, जे तिची आई श्रीदेवीच्या मालकीचं आहे.
advertisement
6/9
जान्हवी कपूर कुत्राप्रेमी आहे. तिच्याकडे ५ वेगवेगळ्या जातींची कुत्री आहेत. जान्हवीकडे अडीच लाख रुपयांचा अमेरिकन अकिता जातीचा कुत्रा आहे. याशिवाय त्याच्याकडे हवनीस जातीचा एक कुत्राही आहे, ज्याची किंमत एक लाख रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे 25 ते 35 हजार रुपये किमतीचा यॉर्कशायर टेरियर कुत्रा आणि 15 ते 30 हजारांचा गोल्डन रिट्रीव्हर कुत्रा देखील आहे.
advertisement
7/9
जान्हवी कपूरकडे लक्झरी गाड्यांचाही ताफा आहे. तिच्याकडे मर्सिडीज मेबॅक आहे. भारतीय बाजारपेठेत या आलिशान कारची किंमत अंदाजे 1.94 कोटी रुपये आहे. तिच्याकडे 95 लाखांची BMW X5 देखील आहे. याशिवाय जान्हवी कपूरकडे 2.7 कोटी रुपयांची Lexus LX 570, 1.62 कोटी रुपयांची Mercedes-Benz S-Class आणि सुमारे 67 लाख रुपयांची Mercedes GLE 250d आहे.
advertisement
8/9
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जान्हवी कपूरची व्हॅनिटी व्हॅन बॉलिवूडमधील सर्वात महागड्या व्हॅनिटीपैकी एक आहे. GQ India च्या माहितीनुसार, जान्हवीने तिच्या लक्झरी व्हॅनिटीवर 1 कोटींहून अधिक खर्च केला आहे. या व्हॅनिटीमध्ये एक Pilates मशीन देखील आहे ज्याची किंमत सुमारे 6 लाख रुपये आहे.
advertisement
9/9
जान्हवी कपूर नुकतीच 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात दिसली होती. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता ती लवकरच ज्युनियर एनटीआरसोबत 'देवरा' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्रीकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
65 कोटींचं घर अन् महागड्या गाड्यांचा ताफा; 27 व्या वर्षी प्रचंड लक्झरी आयुष्य जगते 'ही' स्टारकिड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल