TRENDING:

Dharmendra Property : हेमा मालिनी यांना मिळणार नाही धर्मेंद्र यांची संपत्ती, मग 450 कोटींच्या प्रॉपर्टीवर कोणाचा हक्क?

Last Updated:
Dharmendra Property : धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या या भव्य संपत्तीचे काय होणार आणि त्यांच्या सहा मुलांना या मालमत्तेत किती वाटा मिळेल, याबाबत चाहत्यांच्या मनात कुतुहल निर्माण झाले आहे.
advertisement
1/10
हेमा मालिनीला नाही मिळणार धर्मेंद्र यांची संपत्ती, मग 450 कोटींवर कोणाचा हक्क?
मुंबई : बॉलिवूडचे लाडके 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती. मात्र सोमवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानकपणे खालावली. मुंबईतल्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
advertisement
2/10
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती सुमारे ४०० ते ४५० कोटी रुपये आहे. ते फार्महाऊस आणि आलिशान जीवनशैलीसाठी ओळखले जातात. मात्र, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या या भव्य संपत्तीचे काय होणार आणि त्यांच्या सहा मुलांना या मालमत्तेत किती वाटा मिळेल, याबाबत चाहत्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे.
advertisement
3/10
८९ वर्षीय धर्मेंद्र शेवटपर्यंत चित्रपटांमध्ये सक्रिय होते. त्यांचा आगामी इक्कीस हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अभिनयासोबतच ते ब्रँड एंडोर्समेंट आणि व्यवसायातून मोठी कमाई करायचे.
advertisement
4/10
याशिवाय त्यांचा मुंबईतील आलिशान बंगला, खंडाळा आणि लोणावळ्यातील फार्महाऊस आणि अनेक रिअल इस्टेट प्रॉपर्टीज आहेत. इतकंच नाही, तर त्यांची 'गरम-धरम' (Garam-Dharam) नावाची रेस्टॉरंट चेन अनेक शहरांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
advertisement
5/10
धर्मेंद्र यांच्याकडे लक्झरी कारचे कलेक्शन आहे. त्यांच्याकडे मर्सिडीज बेंझ एस-क्लास आणि लँड रोव्हर रेंज रोव्हरसह अनेक आलिशान गाड्या आहेत. अशातच दिल्ली हायकोर्टाचे वकील कमलेश कुमार मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचा आधार घेत धर्मेंद्र यांच्या मालमत्तेच्या वाटपाचे विश्लेषण केले आहे.
advertisement
6/10
धर्मेंद्र यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न केले. हिंदू विवाह कायद्यानुसार (HMA), पहिली पत्नी जिवंत असताना केलेले दुसरे लग्न अमान्य मानले जाते.
advertisement
7/10
ॲडव्होकेट कमलेश कुमार मिश्रा यांच्या मते, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे लग्न कायदेशीररित्या वैध ठरत नसल्यामुळे, हेमा मालिनींना धर्मेंद्र यांच्या संपत्तीत थेट हिस्सा मिळणार नाही. त्यांना हिस्सा तेव्हाच मिळू शकतो, जेव्हा धर्मेंद्र यांनी त्यांच्या नावे मृत्यूपत्र तयार केलं असेल.
advertisement
8/10
सर्वात महत्त्वाचं म्हणजे धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नातील मुली ईशा देओल आणि आहना देओल यांना वारसा हक्क मिळणार का, असा प्रश्न उभा राहिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 'रेवनसिद्दप्पा विरुद्ध मल्लिकार्जुन' या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, हिंदू विवाह कायद्याअंतर्गत दुसरे लग्न अमान्य असले तरी, त्या लग्नातून जन्मलेली मुले कायदेशीररित्या वैध मानली जातात.
advertisement
9/10
ॲडव्होकेट मिश्रा यांच्या मते, ईशा आणि आहना देओल यांना त्यांच्या वडिलांच्या स्वयं-अर्जित आणि वडिलोपार्जित संपत्तीतील त्यांच्या वाट्यावर पूर्ण हक्क मिळेल.
advertisement
10/10
धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर, त्यांची चार मुले सनी, बॉबी, अजीता, विजेता आणि हेमा मालिनी यांच्या दोन मुली ईशा, आहना अशा सर्व सहा वारसदारांमध्ये धर्मेंद्र यांच्या हिश्यात आलेली मालमत्ता समान वाटली जाईल. या निर्णयामुळे ईशा आणि आहना यांना कायदेशीर अधिकाराने संपत्तीत हिस्सा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dharmendra Property : हेमा मालिनी यांना मिळणार नाही धर्मेंद्र यांची संपत्ती, मग 450 कोटींच्या प्रॉपर्टीवर कोणाचा हक्क?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल