घटस्फोटाच्या 12 वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा प्रेमात, 14 वर्ष जुन्या बेस्ट फ्रेंडसोबतच बांधणार लग्नगाठ, कोण आहे ती?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
टीव्ही विश्वातील सर्वात ग्लॅमरस आणि टॅलेंटेड अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता घटस्फोटाच्या तब्बल १२ वर्षांनी ती लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे.
advertisement
1/7

टीव्ही विश्वातील सर्वात ग्लॅमरस आणि टॅलेंटेड अभिनेत्री जेनिफर विंगेट हिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा तिचं पर्सनल लाइफ नेहमीच जास्त चर्चेत राहिलं आहे. करण सिंग ग्रोवरसोबत झालेल्या घटस्फोटानंतर तब्बल १२ वर्ष जेनिफर सिंगल होती.
advertisement
2/7
यादरम्यान करणने बिपाशा बसुसोबत संसार थाटला, पण जेनिफरने मात्र स्वतःला कामात झोकून दिलं होतं. मात्र, आता चर्चा आहे की जेनिफरच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची चाहूल लागली आहे. तो खास व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तिचा अनेक वर्षांचा जवळचा मित्र करण वाही असल्याचं बोललं जातंय.
advertisement
3/7
जेनिफर आणि करण वाही यांची मैत्री आजची नाही. जेनिफरचं पहिलं लग्न होण्यापूर्वीपासून हे दोघं एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या मैत्रीत काहीतरी शिजतंय, अशा चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
4/7
इंडस्ट्रीतील सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोघं आता केवळ मित्र राहिले नसून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. अनेकदा त्यांना एकत्र क्वालिटी टाईम स्पेंड करताना पाहिलं गेलं आहे, ज्यामुळे त्यांच्या लग्नाच्या अफवांनी जोर धरला आहे.
advertisement
5/7
या दोघांच्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांनी पहिल्यांदा २००७ मध्ये 'दिल मिल गये' या लोकप्रिय शोमध्ये पाहिली होती. तिथे जेनिफर 'डॉ. रिद्धिमा' होती आणि करण वाही 'डॉ. सिद्धांत'च्या भूमिकेत होता. प्रेक्षकांनी या जोडीला तेव्हाही डोक्यावर घेतलं होतं.
advertisement
6/7
तब्बल १४ वर्षांनंतर, २०२४ मध्ये ही जोडी पुन्हा एकदा 'रायसिंघानी व्हर्सेस रायसिंघानी' या वेब सीरिजच्या निमित्ताने एकत्र आली. असं म्हटलं जातंय की, या सीरिजच्या शूटिंगदरम्यानच या दोघांमधील नातं अधिक घट्ट झालं.
advertisement
7/7
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनिफर आणि करण आपल्या नात्याबाबत खूप सीरियस असून त्यांनी कुटुंबीयांच्या संमतीने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर चाहते आधीच या जोडीला 'पॉवर कपल' म्हणू लागले आहेत. मात्र, लग्नाच्या तारखेबाबत किंवा नात्याच्या अधिकृत घोषणेबाबत दोघांनीही अद्याप मौन बाळगलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
घटस्फोटाच्या 12 वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा प्रेमात, 14 वर्ष जुन्या बेस्ट फ्रेंडसोबतच बांधणार लग्नगाठ, कोण आहे ती?