Kajalmaya Off Air : चेटकीणीची जादू 3 महिन्याच संपली, 'काजळमाया'ने गाशा गुंडाळला; या दिवशी शेवटचा एपिसोड
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मराठी मालिकाविश्वात सुरू झालेली हॉरर मालिका अवघ्या 3 महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतेय. कधी आहे शेवटचा एपिसोड?
advertisement
1/7

मराठी मालिकाविश्वात अनेक वर्षांनी एक हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. काजळमाया असं मालिकेचं नाव आहे. एका चेटकीणी स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळत होती. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत होता. मात्र या मालिकेनं अवघ्या 3 महिन्यात गाशा गुंडाळला आहे. काजळमाया ही मालिका लवकरच संपणार आहे. मालिकेच्या अंतिम भागाचा प्रोमो देखील समोर आला आहे.
advertisement
2/7
नव्या मालिका सुरू झाल्या की जुन्या मालिकांच्या वेळा बदलतात किंवा त्या मालिका संपवल्या जातात. काजळमाया मालिकेच्या बाबतीतही असंच काहीस घडलं आहे. अवघ्या 3 महिन्यात ही मालिका ऑफ एअर जाणार आहे. मालिकेच्या अंतिम भागाचा प्रोमो समोर आल्यानंतर प्रेक्षकांनाही नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
3/7
ऑक्टोबर महिन्यात काजळमाया ही मालिका सुरू झाली होती. अभिनेता अक्षय केळकर, रुची जाईल आणि वैष्णवी कल्याणकर यांच्या मालिकेत प्रमुख भूमिका होत्या. सुंदर आणि तंत्रविद्येत प्रवीण असलेली चेटकीण पर्णिका आणि आयुश यांची ही गोष्ट प्रेक्षकांचा निरोप घेतेय.
advertisement
4/7
काजळमाया ही मालिका संपण्यामागचं कारण म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवर तुझ्या सोबतीने ही मालिका सुरू होतेय. रात्री 9 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे. त्यामुळे नशीबवान ही मालिका संपणार असं प्रेक्षकांना वाटलं होतं.
advertisement
5/7
काजळमाया या मालिकेत अभिनेत्री रुची जाईल हिनं चेटकीणीची भूमिका साकारली होती. अभिनेता अक्षय केळकर आरूष, वैष्णवी कल्याणकर हिच्यासह अभिनेत्री प्रिया बेर्डे, मोहन जोशी, समीरा गुजर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत होते.
advertisement
6/7
काजळमाया या मालिकेच्या अंतिम भागाचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात वालावलकर घराणं शापातून मुक्त होतात. अमृता स्वामी आरूषला वाचवतात आणि पर्णिका आणि तिची आई कनकदत्ता यांचा अंत करतात.
advertisement
7/7
"पर्णिका आणि कनकदत्ताचा होणार कायमचा अंत.. अंतिम भाग", असं म्हणत मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. काजळमाया या मालिकेच्या शेवटचा भाग 11 जानेवारी 2026 रोजी रात्री 11.30 वाजता पाहायला मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Kajalmaya Off Air : चेटकीणीची जादू 3 महिन्याच संपली, 'काजळमाया'ने गाशा गुंडाळला; या दिवशी शेवटचा एपिसोड