TRENDING:

कांताराची गोष्ट खरी की खोटी? देवांच्या कथेवर बनवलेल्या फिल्मचं ऋषभ शेट्टीनेच फोडलं गुपित, म्हणाला 'ते मायालोक...'

Last Updated:
Kantara Chapter 1 : पहिल्या 'कांतारा'ने मिळवलेले यश आणि राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळाल्यानंतर आता 'चॅप्टर १' मधून ऋषभ शेट्टी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
advertisement
1/7
कांताराची गोष्ट खरी की खोटी? ऋषभ शेट्टीनेच फोडलं गुपित, म्हणाला 'ते मायालोक...'
मुंबई: सध्या देशभरात अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. चारच दिवसांत २५० कोटींचा टप्पा पार करत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
advertisement
2/7
पहिल्या 'कांतारा'ने मिळवलेले यश आणि राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळाल्यानंतर आता 'चॅप्टर १' मधून ऋषभ शेट्टी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर ऋषभ शेट्टीने एका विशेष मुलाखतीत चित्रपट निर्मितीबद्दल आणि चित्रपटात दडलेल्या रहस्यांबद्दल मोठा खुलासा केला आहे.
advertisement
3/7
ऋषभ शेट्टीने सांगितले की, 'कांतारा'चा हा संपूर्ण प्रकल्प जवळपास पाच वर्षांपासून त्याच्या मनात होता. "पहिल्या भागाला प्रेक्षकांनी जे प्रेम दिले, त्याच प्रेमाच्या जोरावर आणि पूर्ण तयारीने आम्ही 'कांतारा चॅप्टर १' तयार केला आहे. यासाठी आम्ही दिवस-रात्र खूप मेहनत घेतली," असे तो म्हणाला.
advertisement
4/7
चित्रपटात देव-देवतांची कथा दाखवण्यावर त्याने प्रतिक्रिया दिली. "देव आणि देवशक्तीच्या कथा मला खूप आकर्षित करतात. जेव्हा आपण देवाच्या आश्रयाला जातो, तेव्हा बाहेरच्या जगाशी आपला संपर्क आपोआप तुटतो. मन आणि हृदय फक्त त्या शक्तीत लीन होऊन जाते," अशा शब्दांत त्याने या विषयाबद्दलचे आपले आकर्षण व्यक्त केले.
advertisement
5/7
'कांतारा चॅप्टर १' च्या कथेबद्दल बोलताना राष्ट्रीय पुरस्कार विजेते ऋषभ शेट्टी म्हणाले, "पाच वर्षांपूर्वी जेव्हा मला ही कल्पना सुचली, तेव्हा मी लगेच ती लिहायला सुरुवात केली. पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर सगळे दुसऱ्या भागाबद्दल विचारू लागले आणि मी बॅक स्टोरी घेऊन आलो."
advertisement
6/7
या चित्रपटातील कथा किती खरी आहे आणि किती कल्पना आहे, या प्रश्नावर त्याने उत्तर दिले. तो म्हणाला, "यातील कथा सत्य आणि कल्पनेचे मिश्रण आहे. आम्ही एक मायालोक दाखवला आहे. इतिहास आणि देवांच्या कथांना एकत्र गुंफून हा चित्रपट तयार केला आहे."
advertisement
7/7
'कांतारा चॅप्टर १' ने अवघ्या पाच दिवसांत जगभरात ३०० कोटींचा टप्पा पार करत पुन्हा एकदा 'ब्लॉकबस्टर' चित्रपट असल्याचे सिद्ध केले आहे. भारतातही या चित्रपटाने २५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ऋषभ शेट्टीनेच या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये आलेल्या 'कांतारा' चित्रपटाचा प्रीक्वल आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कांताराची गोष्ट खरी की खोटी? देवांच्या कथेवर बनवलेल्या फिल्मचं ऋषभ शेट्टीनेच फोडलं गुपित, म्हणाला 'ते मायालोक...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल