कियाराच्या मुलीचं असं नाव, वाचतानाच जीभ अडखळेल, तुम्हाला तरी उच्चारायला जमतंय का?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Kiara Advani Sidharth Malhotra : कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी चाहत्यांसोबत काही दिवसांपूर्वी मुलगी झाल्याची गुडन्यूज शेअर केली होती. आता त्यांनी तिचं नावदेखील रिव्हील केलं आहे.
advertisement
1/7

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना 16 जुलै 2025 रोजी मुलगी झाली होती. कियारा-सिद्धार्थने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली होती.
advertisement
2/7
कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी आता आपल्या लेकीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लेकीचं नावदेखील जाहीर केलं आहे.
advertisement
3/7
कियारा आणि सिडने आपल्या लाडक्या लेकीचं नाव 'सरायाह' मल्होत्रा असं ठेवलं आहे. हिब्रू आणि अरबीमध्ये 'सरायाह'चा अर्थ राजकन्या असा होतो. विशेष म्हणजे कियारा आणि सिद्धार्थ या दोन नावांनी बनलेलं 'सरायाह' हे नाव आहे.
advertisement
4/7
कियारा आणि सिद्धार्थने लेकीचा पहिला फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"आमची प्रार्थना, आमच्या हातात आहे. आमचा आशीर्वाद, आमची राजकुमारी, सरायाह मल्होत्रा".
advertisement
5/7
कियारा आडवाणी शेवटची 'वॉर-2' या चित्रपटात झळकली होती. तर दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्राचा 'परम सुंदरी' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
advertisement
6/7
कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लव्हस्टोरीची सुरुवात 'शेरशाह' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. या सिनेमाच्या सेटवर कियारा आणि सिड एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे 2023 मध्ये ते लग्नबंधनात अडकले.
advertisement
7/7
लेकीच्या जन्मानंतर सिद्धार्थ आणि कियाराच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. सिद्धार्थ-कियाराने लेकीच्या पाऊलांचा गोड फोटो शेअर केला आहे. दोघांनीही लाडक्या लेकीचे पाऊले आपल्या हातात घेतली आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कियाराच्या मुलीचं असं नाव, वाचतानाच जीभ अडखळेल, तुम्हाला तरी उच्चारायला जमतंय का?