'नवरीला घरी आणण्यासाठी...' स्मृतीसोबतच्या लग्नाबाबत पलाश मुच्छलच्या आईचं मोठं स्टेटमेंट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं पोस्टपोन झालेलं लग्न होणार की याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागून आहे. अशातच पलाश मुच्छलच्या आईने दोघांच्या लग्नाबाबत मोठं स्टेटमेन्ट केलं आहे.
advertisement
1/8

क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबद्दल चाहते अनेक दिवसांपासून चर्चा करत आहेत. 23 नोव्हेंबर रोजी दोघांचं लग्न होणार होतं. पण लग्नाच्या काही तास आधी त्यांचं लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं.
advertisement
2/8
लग्नाच्या दिवशीच स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. हृदयविकाराचा त्रास जाणवल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावे लागले.
advertisement
3/8
या तणावाचा परिणाम पलाशवरही झाला. रक्तदाब वाढल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करावं लागलं. सुरुवातीला त्यांना सांगली येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर मुंबईला हलवण्यात आलं. सध्या पलाशची तब्येत स्थिर असून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
advertisement
4/8
आता स्मृतीचे वडील आणि पलाश दोघेही घरात परतले आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये पुन्हा आशा निर्माण झाली आहे की लवकरच दोघांच्या लग्नाची नवीन तारीख जाहीर केली जाईल. दरम्यान पलाशची आई आमिता मुच्छल यांनी या संपूर्ण प्रकारात आपली प्रतिक्रिया देत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.
advertisement
5/8
पलाशची आई अमिता मुच्छल म्हणाल्या, "स्मृती आणि पलाश दोघेही खूप त्रासात आहेत. पलाश तर त्याच्या नवरीला घरी आणण्याची स्वप्न पाहत होता. मी त्या दोघांच्या स्वागताची तयारी केली होती. सगळं ठीक होईल. लग्न लवकरच होईल."
advertisement
6/8
दरम्यान पलाशची आई अमिता यांच्या या प्रतिक्रियेनंतर दोघांचं लग्न मोडलं आहे या अफवांना तुर्तास पूर्णविराम मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
advertisement
7/8
लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृतीने दोघांच्या लग्नाआधीच्या विधींचे आणि साखरपुड्याचे सगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरून डिलीट केल्या. यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. मात्र आता पलाशच्या आईच्या निवेदनामुळे परिस्थिती ठीक असल्याचं दिसतंय.
advertisement
8/8
या कठीण काळात स्मृतीसोबत राहण्यासाठी जेमिमा रोड्रिग्जने WBBL मधून माघार घेतली असून ती भारतात परतली आहे. त्यामुळे स्मृतीचं लग्न पुढे ढकलणं ही बाब दिसतेय तितकी साधी नसल्याचं बोललं जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'नवरीला घरी आणण्यासाठी...' स्मृतीसोबतच्या लग्नाबाबत पलाश मुच्छलच्या आईचं मोठं स्टेटमेंट