अमिताभ बच्चनचा जावई, तरीही 18 वर्षांपासून करतोय स्ट्रगल, 166 कोटींच्या मालकाने दिला नाही एकही हिट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Amitabh Bachchan Son-in-Law : अमिताभ बच्चन यांच्या जावयाने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले, परंतु त्याला हवी ती ओळख मिळाली नाही. तो ११० कोटींच्या कंपनीचा मालक असूनही, बॉलिवूडमध्ये संघर्ष करत आहे.
advertisement
1/10

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे महानायक म्हणून लोकप्रिय आहेत. ८२ व्या वर्षीही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. त्यांच्याप्रमाणेच त्यांचे कुटुंबही वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. त्यांना अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा ही दोन मुले आहेत.
advertisement
2/10
अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायशी लग्न केले आहे, तर श्वेता बच्चनने निखिल नंदाशी. अमिताभ यांचा जावईही त्यांच्यासारखाच गुणी अभिनेता आहे. मात्र, त्याला इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार करता आलेली नाही. असे असले तरीही हा अभिनेता तब्बल ११० कोटींचा मालक आहे.
advertisement
3/10
आता तुम्ही विचार करत असाल की अमिताभ यांचे जावई निखिल नंदा तर उद्योगपती आहे. मात्र आज आपण निखिल नंदाबद्दल नाही, तर अमिताभ बच्चन यांचा दुसरा जावई कुणाल कपूर याच्याबद्दल जाणून घेणार आहोत, जो चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे.
advertisement
4/10
कुणाल कपूरने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये स्मरणीय भूमिका साकारल्या आहेत, तरीही त्याला हवी ती ओळख मिळाली नाही. हा हँडसम हंक करिअरच्या सुरुवातीला काही चित्रपटांमध्ये दिसला, परंतु आपल्या सासऱ्यांप्रमाणे प्रभाव सोडण्यात तो अपयशी ठरला. कोट्यवधींच्या कंपनीचा मालक असूनही, तो बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडू शकला नाही आणि आजही एका सोलो हिटसाठी संघर्ष करत आहे.
advertisement
5/10
कुणाल चित्रपटात येण्यापूर्वीच व्यवसायात सक्रिय होता. १८ व्या वर्षी तो हाँगकाँगला आंबे निर्यात करायचा. अभिनेता होण्यासाठी त्याने हे काम सोडले. 'अक्स' चित्रपटातून त्याने करिअरची सुरुवात केली, जिथे तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. नंतर त्याने बैरी जॉनकडून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आणि नसीरुद्दीन शाहच्या थिएटर ग्रुप 'मोटले'चा सदस्य झाला.
advertisement
6/10
'मीनाक्षी: ए टेल ऑफ थ्री सिटीज' हा त्याचा पहिला चित्रपट होता, परंतु 'रंग दे बसंती' चित्रपटाने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर त्याने माधुरी दीक्षितसोबत 'हैट्रिक', 'लागा चुनरी में दाग' आणि 'आजा नचले' अशा तीन फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केले.
advertisement
7/10
शाहरुख खानसोबत 'डॉन 2' आणि 'डियर जिंदगी' या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आणि हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. मात्र कुणाल कपूरने काम केलेले हिट चित्रपट हे मल्टी-स्टारर होते. त्याने स्वतःच्या १८ वर्षांच्या करिअरमध्ये एकही हिट चित्रपट दिला नाही.
advertisement
8/10
२०२१ मध्ये 'अनकही कहानियां' आणि 'द एम्पायर' या वेब सीरीजमध्ये तो शेवटचा दिसला, त्यानंतर त्याच्याकडे कोणताही चित्रपट नाही. मात्र तो यशस्वीपणे ११० कोटी रुपयांची कंपनी चालवत आहे. कुणाल क्राउड-फंडिंग प्लॅटफॉर्म केटोचा मालक आहे, ज्याची स्थापना २०१२ मध्ये जहीर अदनवाला आणि वरुण शेठ यांच्या सहकार्याने केली होती.
advertisement
9/10
कुणाल कपूरचे जीवन हे शानदार आहे आणि त्यांची एकूण संपत्ती १६६ कोटी रुपये आहे. त्याने अमिताभ बच्चन यांचे बंधु अजिताभ बच्चन यांची कन्या नैना बच्चनशी लग्न केले आहे. नैना एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. दोघांना एक गोंडस मुलगा आहे आणि तो त्यांच्यासोबत खूप वेळ घालवतो.
advertisement
10/10
कुणालची ऋतिक रोशनसोबतही घट्ट मैत्री आहे. लवकरच तो सैफ अली खान आणि जयदीप अहलावतसोबत 'ज्वेल थीफ' या चित्रपटात दिसणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अमिताभ बच्चनचा जावई, तरीही 18 वर्षांपासून करतोय स्ट्रगल, 166 कोटींच्या मालकाने दिला नाही एकही हिट