Madhuri Dixit: माधुरी दीक्षितच्या सौंदर्यावर फिदा झाला अभिनेता, तिच्यासोबत काम करण्यासाठी थेट फुकट साइन केला सिनेमा
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Madhuri Dixit: हिंदी चित्रपटसृष्टीतील धक-धक गर्ल माधुरी दीक्षित हिचा चार्म कोणाला मोहात पाडत नाही? तिचं हसू, तिचा ग्रेस, आणि तिचं अप्रतिम नृत्य यासाठी चाहते तर वेडे आहेतच. मात्र असे अनेक अभिनेते आहेत जे माधुरीसाठी वेडे आहेत.
advertisement
1/8

हिंदी चित्रपटसृष्टीतील धक-धक गर्ल माधुरी दीक्षित हिचा चार्म कोणाला मोहात पाडत नाही? तिचं हसू, तिचा ग्रेस, आणि तिचं अप्रतिम नृत्य यासाठी चाहते तर वेडे आहेतच. मात्र असे अनेक अभिनेते आहेत जे माधुरीसाठी वेडे आहेत. असाच एक अभिनेता ज्याने फक्त माधुरीमुळे चक्क फ्रीमध्ये सिनेमा साइन केला.
advertisement
2/8
अनेक सहकलाकार देखील माधुरीच्या सौंदर्याला दाद देतात. मात्र 1986 मध्ये एक अभिनेता तिच्यासाठी इतका भारावून गेला की त्याने स्वतःच्या चित्रपटाच्या संपूर्ण फीसवरच पाणी सोडलं आणि सिनेमा फ्रीमध्ये केला.
advertisement
3/8
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून शेखर सुमन आहे. शेखर सुमननेच एका मुलाखतीमध्ये याविषयी सांगितलं होतं. तेव्हा शेखरची कारकिर्द नुकतीच सुरु झालेली.
advertisement
4/8
दिग्दर्शक सुदर्शन रतन यांनी त्यांना मानव हत्या या चित्रपटाची ऑफर दिली. मात्र अट अशी होती. चित्रपटासाठी एकही रुपये मिळणार नाहीत. सुरुवातीला शेखर थोडे दचकले, पण त्यांनी पटकन विचारलं, “नायिका कोण आहे?”
advertisement
5/8
सुदर्शन रतन यांनी नायिकेचं नाव सांगण्यास टाळाटाळ केली. शेवटी शेखरने स्पष्ट सांगितलं, “तू पैसे देत नाहीस, नायिकेचं नावही सांगत नाहीस? मग कसं चालेल?” त्यानंतर दिग्दर्शकाने माधुरी दीक्षितला भेटण्याची संधी दिली. आणि तिथेच एका नजरेत माधुरीला पाहून शेखर सुमन घायाळ झाला.
advertisement
6/8
शेखर सुमन म्हणाला, "ती इतकी सुंदर होती की मी धावत जाऊन तिच्यासोबत काम करीन," आणि मग कोणताही मोबदला न घेता त्यांनी मानव हत्या सिनेमा साइन केला.
advertisement
7/8
शूटिंगच्या दिवसांमध्ये त्यांचं समीकरण आणखी मजेशीर होतं. माधुरी आणि शेखर दोघेही मुंबईतील एकाच भागात राहत होते. रोज सकाळी शेखर आपल्या बाईकवर माधुरीला घेऊन सेटवर जात असे आणि संध्याकाळी तिला परत घरी सोडत असे. त्यांच्या या बाईक राईड्सही त्या काळात चर्चेचा विषय ठरल्या होत्या.
advertisement
8/8
मानव हत्या नंतर दोघांनी 1989 मध्ये आलेल्या त्रिदेवी या हिट चित्रपटात एकत्र काम केलं. आजही शेखर सुमन हा किस्सा सांगताना हसत म्हणतात “त्या वेळी माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रॉफिट म्हणजे माधुरीसोबत घालवलेला वेळ होता. पैशांपेक्षा तो अमूल्य होता!”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Madhuri Dixit: माधुरी दीक्षितच्या सौंदर्यावर फिदा झाला अभिनेता, तिच्यासोबत काम करण्यासाठी थेट फुकट साइन केला सिनेमा