TRENDING:

Madhuri Dixit : वयाच्या 58 व्या वर्षीही माधुरी दीक्षित एवढी सुंदर कशी दिसते? स्वत: सांगितलं सीक्रेट

Last Updated:
Madhuri Dixit : माधुरी दीक्षित आज वयाच्या 58 व्या वर्षीही आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भूरळ पाडत असते. तिच्या अदा आणि मनमोहक सौंदर्याचं रहस्य काय आहे? 'धक-धक गर्ल'चं स्कीनकेअर रुटिन काय आहे? जाणून घ्या.
advertisement
1/9
Madhuri Dixit :  माधुरी दीक्षित एवढी सुंदर कशी दिसते? स्वत: सांगितलं सीक्रेट
माधुरी दीक्षित वयाच्या 58 व्या वर्षीही उत्तमरित्या आपलं फिटनेस जपते. तिच्या फिटनेसमागचं आणि सुंदर दिसण्यामागचं नेमकं काय कारण? असा प्रश्न नेहमीच चाहत्यांना पडत असतो. आता 'धक-धक गर्ल'ने आपलं फिटनेस आणि स्किनकेअर रुटिन चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.
advertisement
2/9
माधुरी दीक्षित म्हणते,"आपण कितीही स्किन केअर केलं, कितीही स्किनची काळजी घेतली तरी एक गोष्ट लक्षात ठेवा आपण सकारात्मक राहिलं पाहिजे. सौंदर्य हे फक्त स्किनकेअर प्रोडक्टमधून मिळत नसतं. आपलं मनसुद्धा तेवढं सुंदर असलं पाहिजे".
advertisement
3/9
चेहऱ्यावर लोशन्स, क्रिम लावून आपल्याला सुंदर होता येत नाही. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. कोणाबद्दलही नकारात्मक विचार करू नये, असा सल्ला माधुरीने चाहत्यांना दिला आहे.
advertisement
4/9
माधुरीला लोकांशी बोलायला खूप आवडतं. त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं. त्यामुळे ती काय आहे? कोण आहे? या गोष्टींचा तिला फारसा फरक पडत नाही.
advertisement
5/9
माधुरी म्हणते सकारात्मक राहण्यासोबत मेडिटेशन केलं पाहिजे. माधुरी ध्यानादरम्यान ओंकार आणि गायत्री मंत्र म्हणते. स्वत:ला सकारात्मक ठेवण्याचा माधुरीचा प्रयत्न असतो.
advertisement
6/9
माधुरी म्हणजे,"तजेलदार चेहरा हवा असेल तर हेल्थी पदार्थ खा. दिवसभर भरपूर पाणी प्या. आपण किती पाणी पितो, काय खातो, याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होत असतो".
advertisement
7/9
माधुरी पुढे म्हणते,"मी चेहऱ्याला रोज गुलाबपाणी लावते. स्किनकेअरच्या वस्तू दररोज चांगल्या क्वालिटीच्या विकत घ्या. घराबाहेर पडण्याआधी नेहमी व्हिटॅमिन C सीरम लावा. त्यानंतर मॉइस्चराइजिंग आणि सनस्क्रीन खूप महत्त्वाचं आहे. स्किन ऑयसी असेल तर वॉटरबेस आणि ड्राय असेल तर क्रीमबेस मॉइस्चराइजर वापरलं पाहिजे".
advertisement
8/9
चाहत्यांना मोलाचा सल्ला देत माधुरी म्हणाली,"झोपण्याआधी मेकअप काढून झोपा. सात ते आठ तासांची झोप ही आवश्यक आहे".
advertisement
9/9
स्किनकेअरसोबतच आपला व्यायाम आणि हेल्दी खाणं तितकंच गरजेचं आहे, अशा टिप्स माधुरी यांनी शेअर केल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Madhuri Dixit : वयाच्या 58 व्या वर्षीही माधुरी दीक्षित एवढी सुंदर कशी दिसते? स्वत: सांगितलं सीक्रेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल