Mahesh Bhatt : महेश भट्टना मनवण्यासाठी विना कपडे रस्त्यावर धावू लागली अभिनेत्री, मुंबईत नेमकं काय घडलं होतं?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Mahesh Bhatt Controversy : महेश भट्ट हे बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय दिग्दर्शक आहेत, मात्र त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच प्रकाशझोतात राहिले.
advertisement
1/5

मुंबई: महेश भट्ट हे बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय दिग्दर्शक आहेत, मात्र त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच प्रकाशझोतात राहिले. बॉलिवूडचे वादग्रस्त दिग्दर्शक महेश भट्ट आणि एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बॉबी यांच्या प्रेमकथेची आजही खूप चर्चा होते.
advertisement
2/5
परवीन बॉबी महेश भट्ट यांच्या प्रेमात इतक्या वेड्या झाल्या होत्या की, एकदा तर त्या त्यांना अडवण्यासाठी कपड्यांविनाच रस्त्यावर धावत सुटल्या होत्या. हा प्रसंग आजही इंडस्ट्रीमध्ये ऐकवला जातो. पण, नेमकं काय घडलं होतं त्या रात्री?
advertisement
3/5
मीडिया रिपोर्टनुसार, परवीन बॉबी महेश भट्टवर जीवापाड प्रेम करत होत्या. महेश भट्टही तिच्यासाठी त्यांची पत्नी आणि मुलीला सोडून तिच्यासोबत राहायला आले होते. पण, याच काळात परवीन यांना एका मानसिक आजाराने ग्रासलं, ज्यातून त्या कधीच बाहेर येऊ शकल्या नाहीत.
advertisement
4/5
महेश भट्ट यांनी स्वतः एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “परवीनसोबत मी राहत असताना एकदा आम्ही दोघे खूप जवळ आलो. पण, त्याचवेळी तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, 'महेश, एकतर मी, नाहीतर यू.जी.?''
advertisement
5/5
परवीन यांच्या या बोलण्याने महेश भट्ट स्तब्ध झाले. त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही आणि ते बेडरूममधून बाहेर निघून गेले. त्यांना थांबवण्यासाठी परवीनही त्यांच्यामागे धावत सुटल्या, पण त्यांनी कपडे घातले नव्हते. तरीही महेश यांनी मागे वळून पाहिलं नाही. यानंतर काही महिन्यांनी त्या दोघांचा ब्रेकअप झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Mahesh Bhatt : महेश भट्टना मनवण्यासाठी विना कपडे रस्त्यावर धावू लागली अभिनेत्री, मुंबईत नेमकं काय घडलं होतं?