TRENDING:

Prajakta Mali Crush : 'या' हिरोसोबत होणार होतं प्राजक्ता माळीचं लग्न? अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'तिची आई माझ्याकडे...'

Last Updated:
Prajakta Mali Crush : काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत प्राजक्ताने एका मराठी अभिनेत्याचं नाव घेत त्याला आपला 'क्रश' म्हटलं होतं. त्या अभिनेत्याने यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
1/9
'तिची आई माझ्याकडे...' 'या' हिरोसोबत होणार होतं प्राजक्ता माळीचं लग्न?
मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असते. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेनंतर तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला.
advertisement
2/9
प्राजक्ताने याच महिन्यात ३६ वा वाढदिवस साजरा केला. अजूनही ती सिंगलच आहे, त्यामुळे तिच्या लग्नाबद्दलही चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते.
advertisement
3/9
काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत प्राजक्ताने एका मराठी अभिनेत्याचं नाव घेत त्याला आपला 'क्रश' म्हटलं होतं. त्या अभिनेत्याने यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
4/9
प्राजक्ता माळीने एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, अभिनेता वैभव तत्त्ववादी हा तिचा एकेकाळी क्रश होता. इतकंच नाही, तर तिने गंमतीत आपल्या आईलाही विचारलं होतं की, 'आई, हा जावई म्हणून चालेल का?'
advertisement
5/9
हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. एका मुलाखतीत वैभव तत्त्ववादीला याबद्दल विचारण्यात आलं. त्याला विचारलं, 'प्राजक्ताने असं म्हटलं होतं की, तिच्या आईने तुम्हाला लग्नासाठी विचारलं होतं. हे खरं आहे का?'
advertisement
6/9
यावर उत्तर देताना वैभव म्हणाला, “मला वाटतं, तुम्ही तो व्हिडिओ नीट पाहिला नाही. त्या व्हिडिओमध्ये ती म्हणाली होती की, 'कॉफी आणि बरंच काही' चित्रपट रिलीज झाल्यानंतर मी आईला म्हटलेलं की, 'आई तुला हा जावई चालेल का?'”
advertisement
7/9
तो पुढे स्पष्टीकरण देत म्हणाला, "ती बातमी ना माझ्यापर्यंत कधी आली, ना तिची आई माझ्याकडे आली. असं काहीच घडलेलं नाही."
advertisement
8/9
प्राजक्ताने तिच्या मुलाखतीत सांगितलं होतं की, 'क्रश हे तुम्हाला कधीही भेटले नाही पाहिजेत, नाहीतर मग ते क्रश राहत नाहीत.'
advertisement
9/9
एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती वैभवसोबत लंडनला गेली होती. तेव्हा ते एकमेकांचे चांगले मित्र झाले. त्यामुळे आता त्याच्यावर पूर्वीसारखा क्रश राहिला नसल्याचंही तिने सांगितलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali Crush : 'या' हिरोसोबत होणार होतं प्राजक्ता माळीचं लग्न? अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'तिची आई माझ्याकडे...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल