बसमध्ये भेट, कंडक्टरमुळे जुळली जोडी; नॅशनल क्रश गिरीजापेक्षाही हटके आहे गिरीश ओक यांची दुसरी लव्हस्टोरी
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Girish Oak Love Story: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नॅशनल क्रश म्हणून व्हायरल झालेल्या गिरिजा ओकचे वडील गिरिश ओक यांची लव्हस्टोरीही अतिशय हटके आहे.
advertisement
1/8

मुंबई: मराठी मनोरंजनसृष्टीतील एक हरहुन्नरी आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेते डॉ. गिरीश ओक. त्यांचा 'बिन लग्नाची गोष्ट' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला.
advertisement
2/8
या निमित्ताने त्यांनी पत्नी पल्लवी ओक यांच्यासह संकर्षण कऱ्हाडेच्या 'आम्ही खारे खवय्ये' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नाचा अतिशय नाट्यमय आणि रोचक किस्सा उलगडला.
advertisement
3/8
गिरीश ओक आणि पल्लवी यांची पहिली भेट एका साध्या मुंबई-पुणे बस प्रवासादरम्यान झाली होती, पण या भेटीत बसमधील कंडक्टरची भूमिका खूप महत्त्वाची ठरली.
advertisement
4/8
पल्लवी आधीच बसमध्ये बसलेल्या होत्या आणि कर्वेनगरला बस आल्यावर गिरीश ओक गाडीत चढले. बसमधील सीट मागे-पुढे असतानाही कंडक्टरने त्यांना जवळजवळ बसण्यास सांगितले.
advertisement
5/8
पल्लवी यांनी ओळख नसतानाही शांतपणे प्रवास केला, पण मनातल्या मनात त्यांनी ही बाब फोनवर त्यांच्या मैत्रिणीला सांगितली. बसमधून उतरल्यावर पल्लवी यांनी हिंमत करून गिरीश ओक यांच्याकडे त्यांचा फोन नंबर विचारला. ओक यांनी लगेच तो दिलाही. या एका भेटीतून त्यांची ओळख वाढली आणि या ओळखीचे हळूहळू प्रेमात रूपांतर झाले.
advertisement
6/8
गिरीश ओक यांचा पहिला घटस्फोट झाला होता आणि त्यांना गिरिजा ही मुलगीही होती. त्यामुळे त्यांच्या या दुसऱ्या लग्नाला पल्लवी यांच्या आई-वडिलांचा तीव्र विरोध होता.
advertisement
7/8
'आम्ही खारे खवय्ये'मध्ये पल्लवी यांनी संकर्षणला सांगितले की, "अतिशय नाट्यमय रीतीने झालेलं आमचं हे लग्न..." यावर गिरीश ओक यांनी दुजोरा देत म्हटले, "हो, म्हणजे विरोधात जाऊन आमचं लग्न झालं होतं. कारण तिच्या आई-वडिलांना ते मान्य नव्हतं."
advertisement
8/8
घरच्यांचा विरोध असूनही, या दोघांनी २००८ मध्ये अखेर विवाह करून आपला संसार थाटला. गिरीश ओक पुढे हसून म्हणाले, "पण आता सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत आणि पल्लवीच्या घरच्यांना मी आपलंसं करून घेतलं आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बसमध्ये भेट, कंडक्टरमुळे जुळली जोडी; नॅशनल क्रश गिरीजापेक्षाही हटके आहे गिरीश ओक यांची दुसरी लव्हस्टोरी