TRENDING:

Gautami Patil: 'नको नको ते लोकही...' बिग बॉस मराठीसाठी गौतमी पाटीलचा स्पष्ट नकार, समोर आलं मोठं कारण

Last Updated:
Gautami Patil on Rejecting Bigg Boss Marathi: गौतमीच्या जबरदस्त फॅन फॉलोईंगमुळे, जर तिने 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली, तर शोचा टीआरपी रेकॉर्डब्रेक होईल, असे मानले जात आहे.
advertisement
1/8
बिग बॉस मराठीसाठी गौतमी पाटीलचा स्पष्ट नकार, समोर आलं मोठं कारण
मुंबई: मराठी मनोरंजनविश्वातील सर्वात मोठा वादग्रस्त आणि लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस मराठी' चा सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या पर्वात कोणकोणते चेहरे दिसणार, याबद्दल सोशल मीडियावर उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
advertisement
2/8
अनेक सेलिब्रिटींच्या नावांची चर्चा असताना, एका नावाने मात्र सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे, ते म्हणजे 'सबसे कातील' गौतमी पाटील! गौतमीच्या जबरदस्त फॅन फॉलोईंगमुळे, जर तिने 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली, तर शोचा टीआरपी रेकॉर्डब्रेक होईल, असे मानले जात आहे.
advertisement
3/8
गौतमी पाटील म्हणजे तरुणाईच्या ओठावरचे एक नाव! तिचा डान्स, तिच्या हटके अदा आणि साधेपणा लोकांना तिच्या प्रेमात पाडतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत, महिला वर्गामध्येही तिची जबरदस्त क्रेझ आहे. त्यामुळे ती 'बिग बॉस मराठी ६' मध्ये दिसणार, अशा चर्चांना उधाण आले होते. मागील काही दिवसांपासून ही चर्चा असली तरी, आता यामागचे सत्य समोर आले आहे.
advertisement
4/8
गौतमी पाटीलला 'कलर्स मराठी'वरील 'बिग बॉस'च्या पाचव्या सीझनसाठीच खुली ऑफर देण्यात आली होती, पण तिने ही ऑफर नम्रपणे नाकारली! यामुळे तिला बिग बॉसच्या घरात पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांची मात्र मोठी निराशा झाली होती.
advertisement
5/8
गौतमीने हा शो का नाकारला, यामागचं खरं कारण अखेर तिने स्वतः सांगितलं आहे, जे ऐकून अनेकांचे मन हेलावून गेले. नुकत्याच एका मुलाखतीत गौतमीने हा खुलासा केला. हा शो कलाकारांना मोठी ओळख आणि कामाच्या नव्या संधी देतो, हे मान्य करूनही तिने माघार घेतली.
advertisement
6/8
गौतमी म्हणाली, "बिग बॉस खूप छान आहे. इथे गेल्यावर लोकांचं करिअर होतंच. पण हा शो नाकारण्याचं कारण वेगळं आहे. पण मी माझ्या आईपासून इतके दिवस दूर राहू शकत नाही. कामाच्या निमित्ताने मी तीन-चार दिवस आईपासून लांब राहू शकते, पण त्याहून जास्त दिवस नाही! पण बिग बॉस खरंच बेस्ट आहे आणि तिथे गेल्यावर नाही नाही ते आपल्याला ओळखतात."
advertisement
7/8
बिग बॉस हा शो तीन महिन्यांचा असतो आणि इतके दिवस मला त्या घरात राहावे लागते. आईवरील तिचे प्रेम आणि तिच्यापासून दूर न राहण्याची तिची भावनिक अडचण यामुळे तिने इतका मोठा शो नाकारला.
advertisement
8/8
दरम्यान, गौतमी पाटील नुकतीच गायक अभिजीत सावंतसोबत 'रुपेरी वाळूत' या रिमिक्स गाण्यात दिसली होती. जुन्या मराठी गाण्याला नवा साज देऊन या दोघांनी प्रेक्षकांसमोर एक नवीन जोडी आणली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Gautami Patil: 'नको नको ते लोकही...' बिग बॉस मराठीसाठी गौतमी पाटीलचा स्पष्ट नकार, समोर आलं मोठं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल