TRENDING:

यशराजच्या 'मर्दानी 3' मध्ये पुण्याचा डंका! राणी मुखर्जीसोबत झळकणार मराठमोळी बालकलाकार, स्टार प्रवाहच्या मालिकेत केलंय काम

Last Updated:
Mardaani 3: राणीच्या बहुप्रतिक्षित 'मर्दानी ३' या चित्रपटाचा डंका सध्या संपूर्ण देशात वाजतोय. पण या चित्रपटाबाबत अभिमानास्पद गोष्ट म्हणजे, यामध्ये एका महत्त्वाच्या आणि मध्यवर्ती भूमिकेत आपली मराठमोळी बालकलाकार झळकणार आहे.
advertisement
1/9
राणी मुखर्जीसोबत झळकणार मराठमोळी बालकलाकार, स्टार प्रवाहच्या मालिकेत केलंय काम
मुंबई : बॉलीवूडची 'लेडी सिंघम' म्हणजेच राणी मुखर्जी जेव्हा पडद्यावर येते, तेव्हा गुन्हेगारांची पळता भुई थोडी होते. राणीच्या बहुप्रतिक्षित 'मर्दानी ३' या चित्रपटाचा डंका सध्या संपूर्ण देशात वाजतोय.
advertisement
2/9
पण या चित्रपटाची सर्वात खास आणि अभिमानास्पद गोष्ट म्हणजे, यामध्ये एका महत्त्वाच्या आणि मध्यवर्ती भूमिकेत आपली मराठमोळी बालकलाकार झळकणार आहे.
advertisement
3/9
राणी मुखर्जीसारख्या दिग्गज अभिनेत्रीसोबत स्क्रीन शेअर करत अवनी जोशीने चक्क यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बॉलीवूडमध्ये दिमाखात एन्ट्री केली आहे.
advertisement
4/9
अभिराज मिनावाला यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला हा चित्रपट मुलींचे अपहरण आणि मानवी तस्करीसारख्या गंभीर विषयावर भाष्य करतो.
advertisement
5/9
चित्रपटात राणी मुखर्जी पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडमध्ये असून तिच्यासमोर मल्लिका प्रसाद ही ताकदवान खलनायिका उभी आहे. मात्र, या संपूर्ण कथेत अवनी जोशी साकारत असलेली भूमिका अतिशय कळीची आणि चित्रपटाच्या कथेला वळण देणारी आहे.
advertisement
6/9
अवनी ही काही सिनेसृष्टीसाठी नवीन नाही. सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी आणि गायिका रसिका जोशी यांची ती कन्या. आई-वडिलांकडून मिळालेला कलेचा वारसा अवनीने अभिनयाच्या माध्यमातून पुढे नेला आहे.
advertisement
7/9
याआधी अनेक गाजलेल्या मराठी मालिका, रिअ‍ॅलिटी शो आणि नुकत्याच गाजलेल्या 'जारण' चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. पण 'मर्दानी ३' हे तिच्या करिअरमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मानले जात आहे.
advertisement
8/9
या भूमिकेबद्दलचा आपला अनुभव सांगताना अवनी ती म्हणाली, "मला यशराज फिल्म्सकडून ऑडिशनसाठी कॉल आला होता. खूप मोठी स्पर्धा होती, पण एक-एक टप्पा पार करत माझी निवड झाली. राणी मॅमसोबत काम करणं हे माझं स्वप्न होतं. त्या सेटवर खूप प्रेमळ असतात. त्यांच्याकडून अभिनयाचे बारकावे शिकायला मिळाले. एवढ्या मोठ्या दिग्गजांसोबत काम करताना सुरुवातीला थोडी भीती वाटली, पण नंतर खूप मजा आली!"
advertisement
9/9
चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच अवनीच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. चित्रपटातील तिची निरागसता आणि तितकाच प्रभावी अभिनय प्रेक्षकांना थक्क करणारा आहे. एका मराठी मुलीने हिंदी सिनेसृष्टीतील एवढ्या मोठ्या फ्रँचायझीमध्ये स्वतःची जागा निर्माण करणे, ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
यशराजच्या 'मर्दानी 3' मध्ये पुण्याचा डंका! राणी मुखर्जीसोबत झळकणार मराठमोळी बालकलाकार, स्टार प्रवाहच्या मालिकेत केलंय काम
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल