Mayuri Deshmukh : डॉक्टर असूनही नावापुढे Dr. का लावत नाही अभिनेत्री मयुरी देशमुख? कारण काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Mayuri Deshmukh : अभिनेत्री मयुरी देशमुख अभिनेत्री होण्याआधी पेशानं डॉक्टर आहे. पण तरीही ती तिच्या नावापुढे डॉक्टर लावत नाही. यामागचं कारण काय?
advertisement
1/9

खुलता कळी खुलेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री मयुरी देशुमख. या मालिकेतून तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली. या सुपरहिट मालिकेनंतर मयुरीनं हिंदी मालिकेत काम केलं. त्यानंतर तिने हिंदी सिनेमातही काम केलं. तिनं 'डिअर आजो' हे मराठी नाटकही लिहिलं.
advertisement
2/9
अभिनेत्री, नाटककार होण्याबरोबरच मयुरी देशमुख ही एक डॉक्टर आहे. ती डेन्टिस्ट आहे. 2011 मध्ये ती पासआऊट झाली आहे. ती डॉक्टर आहे. पण ती लावत नाही. यामागचं कारण तिने सांगितलं.
advertisement
3/9
मयुरी म्हणाली, "माझी ओळख काय आहे हे मी शोधतेय. पॅशन, कुलहूत यामुळे या इंडस्ट्रीत सुरुवात झाली. डॉक्टर न लावण्याचा एक सिंपल कारण होतं ते म्हणजे, मी जर पायलट असते, इंजिनिअर असते आणि मग या क्षेत्रात आले असते तर... तसंच या क्षेत्रात येताना कोणत्याही प्रकारचं बॅगेज नसावं असं मला वाट."
advertisement
4/9
"एक्टर म्हणून मला लोकांनी प्लेन कॅन्वसमध्ये पाहिलं तर ते त्याच्यात रंग भरू शकतील. रॉयटर म्हणून मी डॉक्टर म्हणून आहे ती पदवी वापरू शकते पण एक्टर मला प्लेन कॅन्व्हस असावं असं मला वाटतं."
advertisement
5/9
"मी पण शोधत होते की, आपल्याला सगळं सगळ्यात वयात माहिती असतं असं नाही. त्या क्षणी मला असं वाटलं तर डेंटिस्टनंतर मला या फिल्डमध्ये यावं. त्या पूर्ण प्रवासात मी डॉक्टर लावावं की नाही हे मला फार शुल्लक वाटलं."
advertisement
6/9
"आपण कोणत्याही क्षेत्रात गेलं तर डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला साधारण 5-10 वर्ष द्यावी लागतात. त्या प्रवासात त्या प्रोफेशनसाठी तुमचं कॅरेक्टर बिल्डिंग होतं. इथे निर्णय घेतल्या घेतल्या सगळं मला माहिती असेल असं नाही, तो शोध असतो."
advertisement
7/9
डॉक्टरकी सोडून मयुरीनं अभिनयात येण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल., मयुरीचे आई-वडील आजी आजोबा उच्चशिक्षित चांगल्या हुद्द्यावर काम करणारे होते. ती म्हणाली, "माझा कल आर्ट्सकडे होता. पण मी बेसिकली मी बरे मार्क मिळवायचे. माझी फॅमिली प्रो एज्युकेशन आहे. त्यामुळे शिक्षण चांगलंच घेतलं पाहिजे हे माझ्या मनात होतं."
advertisement
8/9
"तेव्हा आर्ट्सला इतकं महत्त्वं नव्हतं. फॅमिलीमध्ये जेव्हा डॉक्टर्स, इंजिनिअर असतात तेव्हा मुलीसाठी खूप सेफ आणि करेक्टर क्षेत्र मेडिकल मानलं जातं. मोठ्याचं ऐकलं. परीक्षा दिल्या. MBBS ला एडमिशन मिळालं नाही त्यामुळे BDS ला गेले."
advertisement
9/9
"या सगळ्यात मला एक गोष्ट कळली की आपण गुणी आहोत सीन्सियर आहोत पण आपण आपला आतला आवाज नाही ऐकत. आपल्यातून काहीतरी क्रिएटीव्ह एक्सप्रेशन होऊ पाहतंय असं मला माझा आतला आवाज सांगत होता. त्याला आपण वाव देत नाही."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Mayuri Deshmukh : डॉक्टर असूनही नावापुढे Dr. का लावत नाही अभिनेत्री मयुरी देशमुख? कारण काय?