पुणे शहरातून सोलापूरकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 65 वरून जावे लागते. हडपसर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्यामुळे येथे वाहतूक वाढली आहे. सोलापूरहून शहरात येणारी किंवा पुण्यातून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही समस्या सोडवण्यासाठी हडपसरऐवजी आता भैरोबा नाला येथून उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलाची एकूण लांबी सुमारे साडेचार किलोमीटरने वाढणार आहे. या प्रकल्पाचे बांधकाम बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर करण्यात येणार असून कामाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे असेल.
advertisement
पुण्यात 'ही' चूक करताना दहादा विचार करा, 15 पटीने वाढला दंड, थेट कारवाई होणार...
प्रकल्पातील महत्त्वाचे बदल
भैरोबा नाला ते यवत या नव्या मार्गामुळे उड्डाणपूल मार्गाची लांबी आता अंदाजे 39 किलोमीटरपर्यंत जाणार आहे. आधीचा हडपसर–यवत हा सुमारे 34.5 किलोमीटरचा प्रस्ताव होता, त्यामुळे जवळपास साडेचार किलोमीटरचा अतिरिक्त विस्तार होत आहे. लांबी वाढल्यामुळे आधी मंजूर केलेल्या 5,262 कोटी रुपयांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यताही आहे. हा प्रकल्प बीओटी पद्धतीने उभारला जाणार असल्याने काम पूर्ण झाल्यानंतर टोल वसुली सुरू होईल. निविदा प्रक्रिया झाल्यावर तीन वर्षांत काम पूर्ण करण्याचा सरकारचा उद्देश आहे.






