TRENDING:

Arbaaz Khan : अरबाजच नाहीतर 'या' मराठी अभिनेत्यानेही 6 व्या गर्लफ्रेंडशी केलंय लग्न

Last Updated:
अरबाजची बहिण अर्पिता हिच्या घरी अरबाज आणि शौरा यांचं लग्न झालं. लग्नाच्या फॅमिली आणि जवळचे मित्र मैत्रिणी उपस्थित होते. वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला मुलगा अरहान देखील उपस्थित होता. अरहानचे अरबाजच्या लग्नातील फोटो समोर आलेत.
advertisement
1/10
अरबाजच नाहीतर 'या' मराठी अभिनेत्यानेही 6 व्या गर्लफ्रेंडशी केलंय लग्न
अभिनेता आणि सलमान खानचा भाऊ अरबाज खान यानं वयाच्या 57व्या वर्षी लग्न केलं. अरबाजचं हे दुसरं लग्न आहे.
advertisement
2/10
गर्लफ्रेंड शौराबरोबर अरबाजनं दुसरं लग्न केलं.शौरा ही एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. अभिनेत्री मलायका अरोराबरोबर घटस्फोट झाल्यानंतर अरबाजनंतर अरबाजच्या दोन गर्लफ्रेंड झाल्या. पहिल्या गर्लफ्रेंडबरोबरचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.
advertisement
3/10
शौरा या दुसऱ्या गर्लफ्रेंडबरोबर अरबाजनं अखेर लग्नगाठ बांधली. अरबाजनं दुसऱ्या गर्लफ्रेंडबरोबर लग्न केलं. पण तुम्हाला माहिती आहे का एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं त्याच्या 6व्या गर्लफ्रेंडबरोबर लग्न केलं आहे.
advertisement
4/10
फिटनेस आणि मॉडेलिंगमुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेला मिलिंदची पाच अफेअर्स झाली आणि 2018 मध्ये त्याने त्याच्यापेक्षा 25 वर्षांनी लहान अंकिताशी लग्न केलं.
advertisement
5/10
1992 ची मिस युनिव्हर्स मधू सप्रेबरोबर मिलिंद सोमण लिव्ह इनमध्ये राहत होता. एका फॅशन कॅम्पेनसाठी दोघांनी न्यूड पोज दिल्याने चांगलाच वादही झाला होता, पण त्यांचं नात फार काळ टिकलं नाही. दोघेही 1995 मध्ये वेगळे झाले.
advertisement
6/10
2000 साली मिलिंद सोमण आणि दीपानीता शर्मा लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचंही म्हटलं गेलं पण त्यांनी कधीच या नात्याला दुजोरा दिला नाही.
advertisement
7/10
मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांनी 'जुर्म' या सिनेमात एकत्र काम केलं आणि एकमेकांना डेट करू लागले. पण त्यांचंही काही महिन्यात ब्रेकअप झालं.
advertisement
8/10
त्यानंतर व्हॅली ऑफ फ्लॉवर्स या सिनेमाच्या सेटवर मायलिन झाम्पानोईशी मिलिंद सोमणची भेट झाली 2006 मध्ये दोघांनी लग्न केलं. 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
advertisement
9/10
2010 मध्ये अभिनेत्री शहाना गोस्वामी मिलिंदच्या आयुष्यात आली. ते एकत्र इव्हेंट्सनादेखील जायचे. शहाना आणि मिलिंदच्या वयात 21 वर्षांचं अंतर होतं. तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांचं ब्रेकअप झालं.
advertisement
10/10
2018 मध्ये 25 वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोंवरशी मिलिंदनं लग्न केलं. दोघांच्या वयातील अंतरामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Arbaaz Khan : अरबाजच नाहीतर 'या' मराठी अभिनेत्यानेही 6 व्या गर्लफ्रेंडशी केलंय लग्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल