TRENDING:

Hit Movie : तो हिट सिनेमा, ज्याच्या क्लायमॅक्समध्ये हिरोचा मृत्यू, सीन पाहून खूप रडले चाहते; बजेटपेक्षा दुप्पट कमाई

Last Updated:
साऊथचा सुपरस्टार आणि बॉलिवूडची टॉप अभिनेत्री यांची केमिस्ट्री, सोबत ए.आर. रेहमानचं काळजाला भिडणारं संगीत... ही 'डेडली' कॉम्बिनेशन एकत्र आली की काय जादू होते, याचा प्रत्यय आणणारा हा सिनेमा आहे.
advertisement
1/8
क्लायमॅक्समध्ये हिरोचा मृत्यू, सीन पाहून रडले चाहते; बजेटपेक्षा दुप्पट कमाई
काही प्रेमकाहाण्या अशा असतात ज्या पडद्यावर संपतात खरं, पण प्रेक्षकांच्या मनात मात्र त्या कायमच्या घर करून राहतात. आपण आयुष्यात एकदा तरी अशी एखादी फिल्म पाहतो, जी संपल्यानंतर चित्रपटगृहातून बाहेर पडताना आपले डोळे ओले झालेले असतात आणि मन सुन्न झालेलं असतं. सध्या सोशल मीडिया आणि सिनेविश्वात अशाच एका चित्रपटाची चर्चा सुरू आहे, ज्याने प्रेक्षकांना अक्षरशः रडवलंय.
advertisement
2/8
साऊथचा सुपरस्टार आणि बॉलिवूडची टॉप अभिनेत्री यांची केमिस्ट्री, सोबत ए.आर. रेहमानचं काळजाला भिडणारं संगीत... ही 'डेडली' कॉम्बिनेशन एकत्र आली की काय जादू होते, याचा प्रत्यय म्हणजे 'तेरे इश्क में' हा चित्रपट. 'रांझणा' फेम दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी पुन्हा एकदा प्रेमाचा असा काही अंगावर येणारा प्रवास मांडलाय, ज्याची चर्चा आता घरघरात होत आहे.
advertisement
3/8
'रांझणा'ची आठवण करून देणारा तोच 'जुनून'आनंद एल. राय यांनी 2013 मध्ये 'रांझणा' मधून प्रेमाची एक वेगळीच व्याख्या मांडली होती. आता तब्बल 12 वर्षांनंतर त्यांनी त्याच धाटणीचा 'तेरे इश्क में' प्रेक्षकांसमोर आणला. 28 नोव्हेंबर 2025 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकावला.
advertisement
4/8
चित्रपटात साऊथचा नॅशनल अवॉर्ड विजेता अभिनेता धनुष याने 'शंकर' नावाचा असा एक प्रियकर साकारलाय, ज्याचं प्रेम केवळ भावना नाही तर एक 'वेड' आहे. त्याच्यासोबत बॉलिवूडची ग्लॅमरस पण तितकीच कसलेली अभिनेत्री कृती सेनन हिने 'मुक्ती' नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या दोघांची फ्रेश जोडी पडद्यावर पाहताना सुरुवातीला जेवढं छान वाटतं, चित्रपटाचा उत्तरार्ध तेवढाच जड आणि भावूक करणारा आहे.
advertisement
5/8
या चित्रपटाची सर्वात जास्त चर्चा कशामुळे होत असेल, तर ती म्हणजे याच्या शेवटच्या 10-15 मिनिटांमुळे. 'रांझणा' प्रमाणेच या चित्रपटातही हिरोचा शेवट होतो. आपल्या प्रेमासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा शंकर जेव्हा पडद्यावर कोसळतो, तेव्हा थिएटरमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्यात पाणी येतं. धनुषने आपल्या डोळ्यांतून आणि अभिनयातून जे कारुण्य उभं केलंय, ती त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे.
advertisement
6/8
ए.आर. रेहमान यांचे संगीत आणि इरशाद कामिल यांचे शब्द ही या चित्रपटाची दुसरी बाजू आहे. 'आवारा बंजारा' या गाण्याने तर तरुणाईला वेड लावलंय. संगीतामुळे चित्रपटातील प्रत्येक इमोशनल सीन अधिक गडद झाला आहे.
advertisement
7/8
बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस आणि आता OTT वर धमाकाकेवळ कौतुकच नाही, तर या चित्रपटाने गल्लाही जोरात जमवला आहे. साधारण 80 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरातून आतापर्यंत 161 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आयएमडीबी (IMDb) वर याला 7.5/10 रेटिंग मिळाले आहे.
advertisement
8/8
ज्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहात मिस केला आहे, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी. ते 'तेरे इश्क में' आता ओटीटीवर 23 जानेवारी 2026 पासून पाहू शकतात. हा चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix) वर स्ट्रीम होणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आजच्या काळात केवळ ॲक्शन सिनेमे चालतात, तर 'तेरे इश्क में' ने ते खोटं ठरवलंय. इमोशनल ड्रामा आणि प्रामाणिक कथा असेल तर प्रेक्षक आजही मोठ्या पडद्यावर रडायला तयार असतात, हेच या सिनेमाने सिद्ध केलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Hit Movie : तो हिट सिनेमा, ज्याच्या क्लायमॅक्समध्ये हिरोचा मृत्यू, सीन पाहून खूप रडले चाहते; बजेटपेक्षा दुप्पट कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल