TRENDING:

'माझं शारीरिक सुख...', लग्न न करताच 'आई' म्हणवली जाणाऱ्या सेलिब्रिटीचं शॉकिंग वक्तव्य, इंटिमसीवर स्पष्टच बोलली

Last Updated:
तिच्या शिष्यांनी दिलेली ही 'आई'ची पदवी तिने प्रेमाने स्वीकारली खरी, पण समाजाने या नावाभोवती जी मर्यादांची भिंत उभी केली आहे, ती आता तिने अक्षरशः पाडून टाकली आहे.
advertisement
1/8
'माझं शारीरिक सुख..'लग्न न करताच आई म्हणवली जाणाऱ्या सेलिब्रिटीचं शॉकिंग वक्तव्य
मुंबई : बॉलीवूडच्या तालावर जगाला नाचवणारी आणि 'डान्स इंडिया डान्स' सारख्या शोमधून घराघरांत पोहोचलेली आपली लाडकी गीता कपूर आज ५२ वर्षांची झाली आहे. आजही ती अविवाहित आहे, पण तरीही अवघं जग तिला 'गीता मां' या नावानेच हाक मारतं.
advertisement
2/8
तिच्या शिष्यांनी दिलेली ही 'आई'चं पदवी तिने प्रेमाने स्वीकारली खरी, पण समाजाने या नावाभोवती जी मर्यादांची भिंत उभी केली आहे, ती आता गीताने अक्षरशः पाडून टाकली आहे. स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दल आणि शारीरिक सुखाबद्दल गीताने जे विधान केलंय, त्याने सध्या सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
3/8
एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गीता कपूरला तिच्या जुन्या विधानाबद्दल विचारण्यात आलं, ज्यावर मोठा वाद झाला होता. पण गीता मुळीच डगमगली नाही. ती म्हणाली, "लोकांनी मला 'गीता मां' हे नाव दिलं आहे, मी ते मागितलेलं नाही. पण केवळ तुम्ही मला 'आई' म्हणता म्हणून माझी काही खाजगी ओढ किंवा भावना असू शकत नाहीत, असं मानणं चुकीचं आहे. मी काही कुणी 'नन' नाहीये किंवा मी कुमारीही नाहीये."
advertisement
4/8
गीताने पुढे स्पष्ट केलं की, तिचं घरही तसंच आहे जसं सामान्य लोकांचं असतं. ज्या भावना इतरांना असतात, तशाच तिलाही आहेत आणि त्यात काहीही गैर नाही, असं ती ठासून सांगते. जेव्हा तिला शारीरिक सुखाबद्दल विचारलं गेलं, तेव्हा तिने अत्यंत बेधडक उत्तर दिलं.
advertisement
5/8
ती म्हणाली, "तुम्हाला असं का वाटतं की मी फिजिकल सॅटिस्फॅक्शन घेऊ शकत नाही? मी जे विधान केलं होतं, त्यावर आजही ठाम आहे. मी फिजिकली सॅटिस्फॅफाईड आहे. यामध्ये वाईट काय आहे? जग जे करतं तेच मीही करते. फक्त मी एक पब्लिक फिगर आहे म्हणून माझ्यासाठी या गोष्टी टॅबू का मानल्या जातात?"
advertisement
6/8
गीताच्या मते, समाजाने एखाद्या महिलेची इमेज ठरवली की तिच्या नैसर्गिक गरजांकडे दुर्लक्ष केलं जातं. "माझं आयुष्य माझ्या अटींवर आहे," असा संदेश तिने या मुलाखतीतून दिला आहे.
advertisement
7/8
गीता कपूरने फराह खानची असिस्टंट म्हणून करिअर सुरू केलं आणि आज ती इंडस्ट्रीतील टॉप कोरिओग्राफर आहे. तिने कधीच लग्न केलं नाही, पण तिचे शेकडो विद्यार्थी तिला आई मानतात. मात्र, या 'आई'च्या प्रतिमेखाली तिचं स्त्रीत्व दबलं जाऊ नये, असं तिला वाटतं.
advertisement
8/8
तिने कोणतीही कंट्रोवर्सी करण्यासाठी हे विधान केलं नसून, स्त्रियांच्या इच्छांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी हा लढा असल्याचं ती सांगते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'माझं शारीरिक सुख...', लग्न न करताच 'आई' म्हणवली जाणाऱ्या सेलिब्रिटीचं शॉकिंग वक्तव्य, इंटिमसीवर स्पष्टच बोलली
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल