TRENDING:

मायरा वैकुळच्या पालकांचा कठोर निर्णय, सततच्या ट्रोलिंगला कंटाळून उचललं मोठं पाऊल, नेमकं काय घडलं?

Last Updated:
Myra Vaikul: झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनलेली छोटी मायरा वैकुळ सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
advertisement
1/8
मायरा वैकुळच्या पालकांचा कठोर निर्णय, सततच्या ट्रोलिंगला कंटाळून उचललं मोठं पाऊल
मुंबई : झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनलेली छोटी मायरा वैकुळ सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. 'परी' म्हणून घराघरांत पोहोचलेली ही चिमुकली सध्या सोशल मीडियावर दिसत नाहीय.
advertisement
2/8
मायराचे आई-वडील, श्वेता आणि गौरव वैकुळ यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय घेतला असून, मायराचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट चक्क बंद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे तिचे लाखो चाहते संभ्रमात पडले आहेत.
advertisement
3/8
गेल्या काही काळापासून मायराच्या रिल्सवर संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. काही जण तिच्या निरागस अभिनयाचं कौतुक करत होते, तर काही युजर्स तिला ट्रोल करत होते. लहान वयात अशा प्रकारच्या नकारात्मकतेचा परिणाम मुलांच्या मनावर होऊ नये, म्हणूनच पालकांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
advertisement
4/8
विशेष म्हणजे, मायरासोबतच तिचा लहान भाऊ व्योम याचेही सोशल मीडिया अकाउंट बंद करण्यात आले आहे. नुकताच व्योमचा बोरन्हाण सोहळा पार पडला, ज्याचा व्हिडिओ आई श्वेता यांनी शेअर केला, पण त्यात मायरा किंवा व्योम कोणालाही टॅग करण्यात आलेलं नाही.
advertisement
5/8
सोशल मीडियावरून एक्झिट घेतली असली, तरी अभिनयाच्या पडद्यावर मात्र मायरा चांगलीच सक्रिय आहे. अभिनेता श्रेयस तळपदे याच्या वाढदिवसानिमित्त एका नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे, ज्याचे नाव आहे 'मर्दिनी'.
advertisement
6/8
विशेष म्हणजे, 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील हे सुपरहिट त्रिकुट - श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे आणि मायरा वैकुळ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी आणि अभिजीत खांडकेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
advertisement
7/8
श्रेयसने जेव्हा या चित्रपटाची घोषणा केली, तेव्हा मायराला टॅग करण्याऐवजी फक्त तिच्या नावाचा हॅशटॅग वापरला होता, ज्यामुळे तिचे अकाउंट बंद झाल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले.
advertisement
8/8
मायराच्या पालकांनी घेतलेला हा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरतोय. अनेक पालकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, "मुलांना ट्रोलिंगच्या दलदलीतून बाहेर काढणं जास्त महत्त्वाचं आहे." मायरा लवकरच 'मर्दिनी' आणि 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मायरा वैकुळच्या पालकांचा कठोर निर्णय, सततच्या ट्रोलिंगला कंटाळून उचललं मोठं पाऊल, नेमकं काय घडलं?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल