Highest Paid Actress: दीपिका-आलियाला टाकलं मागे, 43 वर्षांची 'ही' अभिनेत्री घेते सर्वात जास्त मानधन, आकडा वाचून व्हाल शॉक
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Highest Paid Actress: आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण गेल्या अनेक वर्षांपासून बॉलीवूडवर राज्य करत आहेत. पण यांच्याशिवाय आणखी एक अभिनेत्री आहे जी खूप महागडी आहे.
advertisement
1/8

सिनेसृष्टीत एकापेक्षा एक सरस अभिनेत्री आहेत. पण जेव्हा आपण बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींचा उल्लेख करतो तेव्हा सर्वात आधी आलिया भट्ट, दीपिका पदुकोण ही नावे येतात. आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण गेल्या अनेक वर्षांपासून बॉलीवूडवर राज्य करत आहेत. पण यांच्याशिवाय आणखी एक अभिनेत्री आहे जी खूप महागडी आहे.
advertisement
2/8
दीपिका आणि आलिया हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. दीपिका पदुकोणने तिच्या 'कलकी 2898 एडी' चित्रपटासाठी 20 कोटी रुपये आणि शाहरुख खानसोबत 'पठाण' चित्रपटासाठी 15 कोटी रुपये घेतले.
advertisement
3/8
आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जी गेल्या 4 वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे, पण ती इंडस्ट्रीतील सर्वात महागडी अभिनेत्री आहे. 43 वर्षीय अभिनेत्री एका मुलीची आई आहे जिने तिच्या शेवटच्या सीरीजसाठी 41 कोटी रुपये आणि तिच्या आगामी चित्रपटासाठी 30 कोटी रुपये इतकी फीज घेतली.
advertisement
4/8
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आहे. सर्वांना मागे टाकत पीसी बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री बनली आहे. आज तिचा 43 वा वाढदिवस आहे. प्रियांका चोप्राने अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या शो सिटाडेलसाठी 41 कोटी रुपये फी घेतली.
advertisement
5/8
एसएस राजामौली यांच्या 'एसएसएमबी29' या चित्रपटासाठी प्रियांका चोप्राला 30 कोटी रुपये मानधन मिळाले आहे, जे आतापर्यंतच्या कोणत्याही महिला अभिनेत्रीसाठी सर्वाधिक मानधन आहे. यासह, ही देसी गर्ल बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री बनली आहे.
advertisement
6/8
प्रियांका चोप्रा शेवटची बॉलिवूड चित्रपट 'द व्हाईट टायगर' मध्ये दिसली होती. या चित्रपटात ती राजकुमार राव, आदर्श गौरव सोबत दिसली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.
advertisement
7/8
प्रियांका चोप्रा शेवटची 2019 मध्ये रुपेरी पडद्यावर दिसली होती. अभिनेत्री शेवटची फरहान अख्तरसोबत 'द स्काय इज पिंक' चित्रपटात दिसली होती. तेव्हापासून प्रियांका चोप्राचे लक्ष हॉलिवूडवर आहे.
advertisement
8/8
प्रियांका चोप्राच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, तिचे 92.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ही अभिनेत्री पर्पल पेबल पिक्चर्स नावाच्या प्रोडक्शन कंपनीची सह-संस्थापक आहे. प्रियांका चोप्राची एकूण संपत्ती 650 कोटी रुपये आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Highest Paid Actress: दीपिका-आलियाला टाकलं मागे, 43 वर्षांची 'ही' अभिनेत्री घेते सर्वात जास्त मानधन, आकडा वाचून व्हाल शॉक