ना रेखा, ना झीनत अमान; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत अमिताभ बच्चन यांनी दिले होते बोल्ड सीन, आजही गाणं सुपरहिट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Amitabh Bachchan : बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आजही आयकॉनिक मानली जाते. रेखाव्यतिरिक्त झीनत अमान आणि परवीन बाबी यांसारख्या बोल्ड अभिनेत्रींसोबतही त्यांनी काम केले.
advertisement
1/8

मुंबई: बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आजही आयकॉनिक मानली जाते. रेखाव्यतिरिक्त झीनत अमान आणि परवीन बाबी यांसारख्या बोल्ड अभिनेत्रींसोबतही त्यांनी काम केले.
advertisement
2/8
पण, तुम्हाला माहीत आहे का, त्या काळात पडद्यावरचे सर्वात जास्त बोल्ड दृश्य त्यांनी दुसऱ्याच एका अभिनेत्रीसोबत दिले होते? ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडमधील सर्वात हुशार आणि प्रतिभाशाली मानली जाणारी स्मिता पाटील!
advertisement
3/8
अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांनी १९८२ मधील 'शक्ती' या ब्लॉकबस्टर चित्रपटात एकत्र काम केले. या चित्रपटातील 'जाने कैसे कब कहाँ' या गाण्यात अमिताभ आणि स्मिता यांनी केवळ जबरदस्त रोमान्सच केला नाही, तर त्या काळानुसार खूपच बोल्ड सीन्स दिले होते, ज्यामुळे हा चित्रपट खूप गाजला. हे गाणे आजही खूप ऐकले जाते आणि यूट्यूबवरही पाहिले जाते.
advertisement
4/8
स्मिता पाटील, जी तिच्या वास्तववादी आणि गंभीर अभिनयासाठी ओळखली जाते, तिने या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती.
advertisement
5/8
'शक्ती' हा चित्रपट फक्त रोमान्समुळेच नाही, तर कथेमुळेही गाजला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिलीप कुमार यांचीही मुख्य भूमिका होती. तसेच यात राखी गुलजार आणि अनिल कपूर यांचा पाहुणे कलाकार म्हणून छोटा सहभाग होता.
advertisement
6/8
चित्रपटाची कथा एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची आणि त्याच्या मुलाच्या संघर्षाची आहे. दिलीप कुमार पोलिस कमिश्नर, तर अमिताभ बच्चन त्यांच्या मुलाच्या भूमिकेत होते. कायदा, नियम आणि न्याय-अन्याय यावर दोघांमध्ये असलेला वैचारिक संघर्ष चित्रपटात प्रभावीपणे दाखवला आहे.
advertisement
7/8
'शक्ती' चित्रपटात एकूण चार गाणी होती, त्यातील 'हमने सनम को खत लिखा' आणि 'जाने कैसे कब कहाँ' ही गाणी तुफान हिट झाली होती. आजही ही गाणी ऐकली जातात.
advertisement
8/8
'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने त्या काळात तब्बल ८ कोटी रुपये कमावले होते, जी त्या वेळच्या हिशोबाने खूप मोठी रक्कम होती. स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन या दोघांनी अभिनयात केलेली ही वेगळी केमिस्ट्री प्रेक्षकांना आजही आवडते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ना रेखा, ना झीनत अमान; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत अमिताभ बच्चन यांनी दिले होते बोल्ड सीन, आजही गाणं सुपरहिट