Bhaiya Gaikwad: 'मी येऊ का?' किंग मेकरचा अध्यक्ष भैय्या गायकवाड म्हणतोय, 'Video डिलीट करा', मारहाणीचे PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
रिलस्टार किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष भैय्या गायकवाडला छत्रपती संभाजीनगरमध्ये टोल नाक्यावर बेदम मारहाण झाली. टोल घेण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून भैय्या गायकवाडला ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
1/9

डोक्यावर कुंकाची 3 बोटं, गळ्यात सोन्याची जाड साखळी अन् हातात मोबाईल तोही स्पिकरवर ठेवून कुणाला तरी फोन लावायचा, काम करतात की नाही, का मी येऊ, अशा स्टाईलमध्ये बोलणारा रिलस्टार किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष भैय्या गायकवाडला छत्रपती संभाजीनगरमध्ये टोल नाक्यावर बेदम मारहाण झाली. टोल घेण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून भैय्या गायकवाडला ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहे.
advertisement
2/9
रिलस्टाार भैय्या गायकवाड हा छ.संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यात उपोषणकर्ते मंगेश साबळे यांची भेट घेण्यासाठी आला होता. तिथून परत नाशिककडे येत असताना समृद्धी महामार्गावर सावंगी टोलनाक्यावर भैय्या गायकवाड तिथे पोहोचला. त्यावेळी ही मारहाणीची घटना घडली.
advertisement
3/9
कारवर फास्ट टॅग नव्हता. त्यामुळे टोलसाठी शिल्लक पैसे द्यावे लागणार होते. यावरून भैय्या गायकवाड गाडीतून खाली उतरला. टोल कर्मचाऱ्यांशी आपल्या स्टाईलमध्ये बोलण्यास सुरुवात केली.
advertisement
4/9
बघता बघता टोल कर्मचारी आणि भैय्या गायकवाडमध्ये बाचाबाची झाली. व्हिडीओमध्ये दिसतंय की, टोल कर्मचाऱ्यांचा पगार किती आहे, यावरून त्यांना डिवचण्यात आलं. मग संतापलेल्या तरुणांनी गायकवाडवर हल्ला केला.
advertisement
5/9
६ जणांनी मिळून भैय्या गायकवाडला चांगलाच चोप दिला. बेदम मारहाण करत असताना टोल कर्मचाऱ्यांनी भैय्या गायकवाडचा व्हिडीओ सुद्धा रेकॉर्ड केला.
advertisement
6/9
भैय्या गायकवाडला या टोल कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण करत आहे, पण, त्याने व्हिडीओ तरी डिलीट करा, अशी विनवणी करत होता
advertisement
7/9
टोल नाक्यावर जाणाऱ्या इतर लोकांंनीही मारहाणीचा हा व्हिडीओ रेकॉर्ड केला. यामध्ये स्पष्ट दिसतंय की, ७ जण गायकवाडला मारहाण करत होते.
advertisement
8/9
कर्मचाऱ्यांनी भैय्या गायकवाडला टोल नाक्यावरून दूरपर्यंत नेत त्याला मारहाण केला. मारहाणीनंतर गायकवाड हा टोलनाक्यावरच बसला होता. त्याचा फोटोही व्हायरल झाला आहे.
advertisement
9/9
भैय्या गायकवाडनेही पोलीस स्टेशन अजून गाठलं नाही. पण, भैय्या गायकवाडला मारहाणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Bhaiya Gaikwad: 'मी येऊ का?' किंग मेकरचा अध्यक्ष भैय्या गायकवाड म्हणतोय, 'Video डिलीट करा', मारहाणीचे PHOTOS