ना शाहरुख, ना आमिर, या मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलिवूडला दिली पहिली 100Cr फिल्म; आजही तीच क्रेझ
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood First 100cr Film : 90 च्या दशकात एक असा चित्रपट आला, ज्याने बॉलीवूडच्या इतिहासाला एक नवं वळण दिलं.
advertisement
1/7

मुंबई: ९० च्या दशकातील बॉलीवूडचा सुवर्णकाळ प्रत्येकाच्या स्मरणात आहे. या काळात अनेक अविस्मरणीय चित्रपट प्रदर्शित झाले. पण याच काळात एक असा चित्रपट आला, ज्याने बॉलीवूडच्या इतिहासाला एक नवं वळण दिलं.
advertisement
2/7
तब्बल १४ गाणी आणि साडेतीन तासांपेक्षा जास्त कालावधी असलेला हा चित्रपट १३५ आठवडे थिएटरमध्ये चालला आणि १०० कोटींचा गल्ला जमवणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. तुम्ही म्हणाल, 'गजनी'? तर नाही, 'गजनी'च्या १४ वर्षे आधीच हा चित्रपट आला होता.
advertisement
3/7
आमिर खानच्या 'गजनी' या चित्रपटाला १०० कोटींचा गल्ला जमवणारा पहिला चित्रपट मानला जातो. पण हा समज चुकीचा आहे. तब्बल १४ वर्षे आधीच अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेता सलमान खान यांच्या एका चित्रपटाने हा रेकॉर्ड बनवला होता. हा चित्रपट होता, सूरज बडजात्या दिग्दर्शित, 'हम आपके हैं कौन'
advertisement
4/7
१९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं. 'मैने प्यार किया' नंतर सूरज बडजात्या यांचा हा दुसरा चित्रपट होता, आणि यात जवळपास 'मैने प्यार किया' मधील सर्व कलाकार होते. फक्त मुख्य नायिका म्हणून भाग्यश्रीच्या जागी माधुरी दीक्षित होती, आणि तिच्या अभिनयाने चित्रपटात आणखीनच रंग भरले.
advertisement
5/7
'हम आपके हैं कौन!' हा चित्रपट फक्त ६ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता. पण या चित्रपटाने भारतात ११७ कोटी रुपयांची कमाई केली, आणि परदेशातूनही ११ कोटी रुपये कमावले. त्यामुळे जगभरात या चित्रपटाने एकूण १२८ कोटींचा गल्ला जमा केला होता.
advertisement
6/7
या चित्रपटाची जवळपास ७५ ते १२५ दशलक्ष तिकिटे विकली गेली होती. महत्त्वाचं म्हणजे, १३५ आठवड्यांपेक्षा जास्त काळ हा चित्रपट थिएटरमध्ये होता, आणि १०० आठवड्यांहून अधिक काळ तो हाऊसफुल होता.
advertisement
7/7
या चित्रपटाला एकूण ४,३५० स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आलं होतं. 'हम आपके हैं कौन' या चित्रपटाने फक्त कमाईचाच नाही, तर प्रेक्षकांच्या मनातही अढळ स्थान मिळवलं आहे. आजही हा चित्रपट टीव्हीवर लागल्यावर लोक आवडीने बघतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ना शाहरुख, ना आमिर, या मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलिवूडला दिली पहिली 100Cr फिल्म; आजही तीच क्रेझ