TRENDING:

तयार राहा, Netflix कडून आल्यात TOP 10 फिल्म्स, तुम्ही कोणती पाहणार, ही घ्या List

Last Updated:
Netflix : नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने सर्वाधिक पाहिले जात असलेल्या 10 चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या यादीत एकाही भारतीय चित्रपटाचा समावेश नाही.
advertisement
1/10
Netflix कडून आल्यात TOP 10 फिल्म्स, तुम्ही कोणती पाहणार, ही घ्या List
1. के. पॉप डीमन हंटर्स - नेटफ्लिक्सने जाहिर केलेल्या यादीत 'के. पॉप डीमन हंटर्स' हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाला 325.1 रेटिंग मिळाले आहे. म्युझिक, अॅक्शन आणि जबरदस्त एनर्जीचा मिलाफ या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. के-पॉप आणि डीमन या जोडीने कमाल केली आहे.
advertisement
2/10
रेड नोटिस : रेड नोटिसने दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला आहे. या वेबसीरिजला 230.9 मिलियन व्ह्यूज मिळालेल्या या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना अॅक्शन, चोरी आणि विनोदाचा धमाकेदार तडका पाहायला मिळेल. ड्वेन, जॉनसन, गैल गैडोट आणि रयान रेनॉल्ड्स या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे.
advertisement
3/10
कॅरी ऑन : 'कॅरी ऑन' हा चित्रपट तिसऱ्या स्थानावर आहे. या चित्रपटाला 172.1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. या चित्रपटातील थराराची जगभरात चर्चा आहे. एका सुरक्षा अधिकाऱ्याच्या रहस्यमय मिशनवर बेतलेला हा चित्रपट आहे.
advertisement
4/10
डोन्ट लुक अप : 'डोन्ट लुक अप' या चित्रपटाला 171.4 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. अनोखी गोष्ट असणाऱ्या या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना शिकायलादेखील मिळेल.
advertisement
5/10
द एडम प्रोजेक्ट : 'द एडम प्रोजेक्ट' या चित्रपटाला 157.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. या चित्रपटात प्रवास, भावना आणि एका कुटुंबाची गोष्ट दाखविण्यात आली आहे. चित्रपटातील रयान रेनॉल्ड्सचा दमदार अभिनय जिंकून घेतो.
advertisement
6/10
बर्ड बॉक्स : 'बर्ड बॉक्स' हा चित्रपट 157.4 लोकांनी पाहिला आहे. डोळ्यावर पट्टी, प्रत्येक पावलावर खतरा आणि जिंकण्याची आशा हे या चित्रपटात दाखवलं आहे. सैंड्रा बुलॉकचा हा चित्रपट रहस्याची परिभाषा बदलतो.
advertisement
7/10
बॅक इन अॅक्शन : 'बॅक इन अॅक्शन' या चित्रपटाने धमाका केला आहे. 147.2 मिलियन व्ह्यूज असणाऱ्या या चित्रपटाच्या माध्यमातून कॅमरून डियाज आणि जेमी फॉक्स यांनी जबरदस्त कमबॅक केलंय. अॅक्शन आणि मस्तीचा कॉम्बो असणार्‍या या चित्रपटाने नेटफ्लिक्सवर आग लावली आहे.
advertisement
8/10
लीव द वर्ल्ड बिहाइंड : 'लीव द वर्ल्ड बिहाइंड' या चित्रपटाने 147.4 मिलियन व्ह्यूज मिळवत प्रेक्षकांच्या मनात रहस्य आणि भीती दोन्ही निर्माण केलंय. जुलिया रॉबर्ट्स आणि इथन हॉक यांचा हा चित्रपट दाखवतो की जेव्हा जग थांबतं तेव्हा खऱ्या अर्थाने नात्यांची किंमत कळते.
advertisement
9/10
द ग्रे मॅन : 'द ग्रे मॅन' या चित्रपटाला 139.3 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. अॅक्शन प्रेमींसाठी हा चित्रपट एक ट्रीट आहे. रयान गोसलिंग आणि बनाम क्रिस इवांस या दोन स्टायलिश एजेंट्सचा जबरदस्त मुकाबला पाहायलाच हवा असा आहे.
advertisement
10/10
डॅम्सल : डॅम्सला या चित्रपटाला 138 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. एका राजकन्येची गोष्ट या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. ताकद, साहस आणि आत्मविश्वासाने भरलेला हा चित्रपट प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी असा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तयार राहा, Netflix कडून आल्यात TOP 10 फिल्म्स, तुम्ही कोणती पाहणार, ही घ्या List
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल