निक्की तांबोळीच्या डोळ्याला मोठी दुखापत, घाबरलेल्या अवस्थेत हॉस्पिटलबाहेर स्पॉट झाली, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Nikki Tamboli : निक्की तांबोळी नुकतीच हॉस्पिटलच्या बाहेर स्पॉट झाली. निक्कीच्या डोळ्याला पट्टी लावलेली दिसली. निक्कीला नेमकं झालंय काय?
advertisement
1/9

बिग बॉस गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री, मॉडेल म्हणजे निक्की तांबोळी. बिग बॉस मराठीचा 5 वा सीझन निक्कीने गाजवला. निक्की ही सोशल मीडियावर सेन्सेशन आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सातत्यानं व्हायरल होत असतात. निक्कीचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून तिच्या चाहत्यांना धडकीच भरली.
advertisement
2/9
निक्की तांबोळी थेट एका डोळ्याला पट्टी लावून सगळ्यांसमोर आली. निक्कीचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तिच्या डाव्या डोळ्याला सफेद पट्टी लावली आहे. निक्कीला नुकतंच हॉस्पिटलमधून बाहेर येताना स्पॉट करण्यात आलं.
advertisement
3/9
निक्कीच्या डोळ्याची पट्टी पाहून नक्कीच तिची सर्जरी झाल्याचा अंदाज तिच्या चाहत्यांनी लावला आहे. निक्कीला नेमकं काय झालं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.
advertisement
4/9
निक्कीबरोबर बिग बॉस अरबाज पटेल देखील तिच्याबरोबर स्पॉट झाला. अरबाज पटेल निक्कीबरोबर हॉस्पिटलमध्ये गेला होता. डोळ्यांची सर्जरी झालेल्या निक्कीची तो काळजी घेताना दिसला.
advertisement
5/9
निक्की आणि अरबाज हॉस्टिपलमधून बाहेर पडताना दिसले. निक्की खूप घाबरलेली आणि इमोशनल झाली होती. तर अरबाज तिला प्रोटेक्ट करताना दिसला. दोघे कारमध्ये बसून निघून गेले.
advertisement
6/9
निक्कीचा हा व्हिडीओ समोर येण्याआधी तिचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ समोर आला होता ज्यात ती तिच्या डाव्या डोळ्याला काहीतरी झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. निक्कीचा डावा डोळा सुजला होता.
advertisement
7/9
निक्कीच्या डाव्या डोळ्याला फोड आल्याचं व्हिडीओमध्ये दिसत होती. निक्की देखील त्यामुळे खूप डिस्टर्ब वाटली. निक्कीच्या डोळ्याची पट्टी पाहून तिला नेमकं काय झालं आहे याची काळजी तिच्या चाहत्यांना लागून आहे.
advertisement
8/9
नुकतीच मकर संक्रात झाली. यावेळी निक्की अरबाजबरोबर एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी निक्कीने सगळ्या पापाराझींना तिळाचे लाडू खाऊ घातले. सगळ्यांना मकर संस्कांतीच्या शुभेच्छा देखील दिल्या.
advertisement
9/9
निक्कीचा मकर संक्रांतीचा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच तिचा डोळ्याला पट्टी लावलेला व्हिडीओ समोर आला. निक्कीचा डोळा लवकर बरा व्हावा यासाठी चाहत्यांनी काळजी व्यक्त करत तिला आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
निक्की तांबोळीच्या डोळ्याला मोठी दुखापत, घाबरलेल्या अवस्थेत हॉस्पिटलबाहेर स्पॉट झाली, PHOTO