TRENDING:

एक चूक अन् पंकज त्रिपाठींना महिन्यातून दोनदा साजरा करावा लागतो बर्थडे! मग वाढदिवसाची खरी तारीख कोणती?

Last Updated:
Pankaj Tripathi Birthday : पंकज त्रिपाठींचा वाढदिवस ५ सप्टेंबरला असतो, कारण बहुतेक लोक त्यांना याच दिवशी शुभेच्छा देतात. पण, हे सत्य नाही.
advertisement
1/7
एक चूक अन् पंकज त्रिपाठींना महिन्यातून दोनदा साजरा करावा लागतो बर्थडे!
मुंबई: ‘मिर्झापूर’ वेब सिरीजमधील ‘कालीन भैय्या’ म्हणजेच प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात.
advertisement
2/7
पण, त्यांच्या आयुष्यातील एक मजेशीर किस्सा ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पंकज त्रिपाठी एका चुकीमुळे वर्षातून दोनदा वाढदिवस साजरा करतात.
advertisement
3/7
तुम्हालाही वाटत असेल की, पंकज त्रिपाठींचा वाढदिवस ५ सप्टेंबरला असतो, कारण बहुतेक लोक त्यांना याच दिवशी शुभेच्छा देतात. पण, हे सत्य नाही. ५ सप्टेंबर ही त्यांच्या वाढदिवसाची खोटी तारीख आहे. पण मग त्यांच्या जन्माची खरी तारीख कोणती?
advertisement
4/7
पंकज त्रिपाठींनी एका मुलाखतीत स्वतःच हा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, ५ सप्टेंबरला माझा वाढदिवस असतो हे ठीक आहे, पण यामागे एक रंजक कथा आहे.
advertisement
5/7
पंकज त्रिपाठींनी या मुलाखतीत सांगितलं, “माझ्या लहानपणी जेव्हा शाळेत शिक्षकांनी माझ्या जन्माची तारीख विचारली असेल, तेव्हा माझ्या भावाने शिक्षकांना ती तारीख सांगितली नसेल. त्यामुळे शिक्षकांनी विचार केला असेल की, ५ सप्टेंबरला शिक्षक दिन आहे आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचाही वाढदिवस असतो. त्यामुळे त्यांनी ५ सप्टेंबर हीच तारीख माझ्या कागदपत्रांमध्ये टाकली असावी.”
advertisement
6/7
बस, तेव्हापासून पंकज त्रिपाठींना दोन वाढदिवसांच्या झमेल्यात अडकावं लागलं आहे. एका महिन्यात ते दोन वेळा शुभेच्छा स्वीकारतात.
advertisement
7/7
त्यांचा वाढदिवस खरं तर २८ सप्टेंबरला असतो, पण ५ सप्टेंबरलाही त्यांना भरभरून शुभेच्छा मिळतात. त्यांच्या या मजेशीर किस्स्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एक चूक अन् पंकज त्रिपाठींना महिन्यातून दोनदा साजरा करावा लागतो बर्थडे! मग वाढदिवसाची खरी तारीख कोणती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल