TRENDING:

पहिला सीन पाहूनच झोप उडेल, क्लायमॅक्स तर डोकं फिरवणारा; OTT वर टॉप ट्रेंडिंग आहे सिनेमा

Last Updated:
Top Trending Film On OTT : या सिनेमाचा पहिला सीन तुमचं मन हादरवून टाकेल. क्लायमॅक्स तर मोठा धक्काच देईल. थ्रिलर स्टोरी सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे
advertisement
1/8
पहिला सीन पाहून झोप उडेल,क्लायमॅक्स डोकं फिरवणारा;OTT वर टॉप ट्रेंडिंग आहे फिल्म
दर आठवड्याला वेगवेगळ्या ओटीटीवर नवीन चित्रपट प्रदर्शित होतात. पण आजकाल एक चित्रपट त्याच्या जबरदस्त स्टोरीमुळे खूप चर्चेत आहे. ओटीटीवर येताच हा सिनेमाने ट्रेंडिंग लिस्टमध्ये स्थान मिळवले आहे.
advertisement
2/8
'मार्गन' या सिनेमाबद्दल आपण बोलत आहो.  हा एक अलौकिक गुन्हेगारी-थ्रिलर सिनेमा आहे. तमिळ भाषेत हा सिनेमा बनवला आहे. यात विजय अँटनी, अजय दिशान, दीपशिखा, अर्चना आणि इतर अनेक स्टार आहेत. त्याची कथा एका मुलीच्या हत्येपासून सुरू होते.
advertisement
3/8
पहिला सीन पाहून मन हादरून जाईल आणि नंतर क्लायमॅक्सपर्यंत तुम्ही संपूर्ण चित्रपट पाहण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही. मार्गन चित्रपटाच्या सुरुवातीला एका मुलीची विचित्र पद्धतीने हत्या केली जाते. मुलीचा मृतदेह संपूर्ण काळवंडतो.
advertisement
4/8
मग पोलीस या खून प्रकरणाची चौकशी सुरू करतात. पण मारेकरी कोणताही सुगावा सोडत नाहीत ज्यामुळे पोलिसांना त्याला शोधण्यासाठी घाम फुटतो. कथा जसजशी पुढे सरकते तसतसे रहस्य आणखी गहिरे होत जाते.
advertisement
5/8
विशेष गोष्ट म्हणजे चित्रपटात सस्पेन्सचा इतका मजबूत तडका जोडला गेला आहे की तुम्हाला शेवटपर्यंत मारेकरी सापडणार नाही. शेवटी असा एक खुलासा होतो जो तुम्हाला धक्का देईल. हा चित्रपट तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
advertisement
6/8
विजय अँटनी यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे आणि इतर कलाकारांनीही चांगले काम केले आहे. सध्या हा चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. तुम्ही हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.
advertisement
7/8
विजय अँटनी यांच्या मॉर्गन चित्रपटाने देशातील टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये स्थान मिळवले आहे. सध्या हा सिनेमा तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या सिनेमाल IMDBवर 10 पैकी 6.8 रेटिंग मिळाले आहे.
advertisement
8/8
मॉर्गन चित्रपटाचे दिग्दर्शन लिओ जॉन पॉल यांनी केले आहे आणि त्यांनी त्याची कथा देखील लिहिली आहे. जर तुम्हाला क्राइम थ्रिलर पाहण्याची आवड असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठी एक परिपूर्ण पर्याय असू शकतो. हा सिनेमा जिओ हॉटस्टारवर हिंदी भाषेतही उपलब्ध आहे.(फोटो साभार: IMDb)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पहिला सीन पाहूनच झोप उडेल, क्लायमॅक्स तर डोकं फिरवणारा; OTT वर टॉप ट्रेंडिंग आहे सिनेमा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल