TRENDING:

'दशावतार' नंतर मराठमोळ्या अभिनेत्रीचा सिनेमा Oscarमध्ये, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांची इमोशनल पोस्ट

Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लिहिलेला आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते गजेंद्र अहिरे यांचं दिग्दर्शन असलेला सिनेमा ऑस्कर 2026 साठी निवडला गेला आहे.
advertisement
1/7
'दशावतार' नंतर मराठी अभिनेत्रीचा सिनेमा Oscarमध्ये, गजेंद्र अहिरे यांची पोस्ट
मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद क्षण आहे. कोकणातील जमिनींचा ज्वलंत प्रश्न मोठ्या पडद्यावर मांडणारा 'दशावतार' हा सिनेमा ऑस्करच्या मुख्य स्पर्धेत निवडला गेला. 'दशावतार' सिनेमाच्या संपूर्ण टीमचं कौतुक होतंय. मराठी सिनेसृष्टीचा हा अभिमानाचा क्षण आहे.
advertisement
2/7
'दशावतार'नंतर काही दिवसांतच आणखी एक मोठी बातमी समोर आली. एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा सिनेमा ऑस्करसाठी निवडला गेला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गजेंद्र अहिरे यांनी पोस्ट लिहित ही माहिती दिली आहे.
advertisement
3/7
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित आणि तृप्ती भोईर प्रेझेंट 'पारो : The Untold Story of Bride Slavery' या हिंदी सिनेमाचाही ऑस्करसाठी निवड झाली आहे. 2026 च्या ऑस्कर कंटेन्शन लिस्टमध्ये पारोची निवड झाली.
advertisement
4/7
दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, "PARO: The Untold Story of Bride Slavery' या सिनेमाने 2026 च्या ऑस्कर कंटेन्शन लिस्टमध्ये यशस्वी प्रवेश केला आहे. ‘PARO’ ऑस्करसाठी पात्र ठरणं हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे."
advertisement
5/7
ही एक अत्यंत महत्त्वाची कथा असून ती जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांना अंतर्मुख करायला हवी. या प्रवासामागे उभे राहिलेल्या संपूर्ण टीमचे आणि या कथेला जागतिक व्यासपीठावर नेण्यासाठी साथ देणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार.
advertisement
6/7
पारो सिनेमाची कथा ही तृप्ती भोईर हिनं लिहिली आहे. तर दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केलं आहे.  सिनेमाची पटकथा आणि गाणी देखील त्यांनीच लिहिली आहेत.
advertisement
7/7
पारो सिनेमाची कथा ही तृप्ती भोईर हिनं लिहिली आहे. तर दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केलं आहे.  सिनेमाची पटकथा आणि गाणी देखील त्यांनीच लिहिली आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'दशावतार' नंतर मराठमोळ्या अभिनेत्रीचा सिनेमा Oscarमध्ये, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांची इमोशनल पोस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल