Marathi Actor : वर्गातील अटेडन्सआधी टपरीवर हजेरी, मराठी अभिनेता सुट्टा मारून जायचा शाळेत
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Actor : प्रसिद्ध मराठी अभिनेता शाळेत असताना वर्गात अटेडन्स लावण्यासाठी टपरीवर हजेरी लावायचा. सुट्टा मारून तो शाळेत जायचा. 
advertisement
1/8

 आयुष्यात पहिल्यांदा केलेली प्रत्येक गोष्ट ही खास असते. पहिलं प्रेम, पहिला प्रवास, पहिला जॉब, पहिली मैत्रीण-मित्र, पहिली प्रेयसी-प्रियकर. मित्रासोबत प्यायलेली पहिली सिगरेट किंवा दारू ही देखील खासच असते.
advertisement
2/8
 प्रसिद्ध मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्री जेव्हा पहिल्यांदा सिगरेट प्यायला होता तेव्हाचा तो प्रसंग त्याने नुकत्याच एका मुलाखतीत शेअर केला.
advertisement
3/8
 आरपारला दिलेल्या मुलाखतीत दहावीत असताना पहिली सिगरेट प्यायलो होतो असं पुष्करनं सांगितलं. पुष्कर म्हणाला, "पहिली सिगरेट शाळेत दहावीत असताना माझ्या मित्राच्या घरी प्यायलो. गमंत अशी झाली की, आमची दुपारशी शाळा असायची. सकाळी सगळं आवरून, गृहपाठ वरैगे करून झालेला असायचा."
advertisement
4/8
 "माझा मित्र दोन-तीन बिल्डिंग सोडून राहायचा. मी त्याच्याकडे जायचो. जरा खेळायचो. मग आम्ही आवरून शाळेत जायचो. एकदा मी त्याच्याकडे गेलो, बेल वाजवली तरी बराच वेळ त्याने दार उघडलं नाही. म्हटलं याला एवढा वेळ का लागतोय."
advertisement
5/8
 "नंतर दार उघडलं त्याने, आत गेल्यानंतर मला म्हणाला, सिगरेट प्यायचीये. मी अवाक् झालो. तो म्हणाला, तू आलास तेव्हा मी सिगरेट पित होतो. ते लपवण्यात आणि वाल घालवण्यात माझा वेळ गेला. तो म्हणाला, प्यायची? म्हटलं चलं."
advertisement
6/8
 पुष्करने पुढे सांगितलं, "आदल्या दिवशी त्याच्या घरी पार्टी झाली होती. त्या पार्टीत त्याच्या वडिलांचं एक सिगरेटचं पाकिट खाली पडलेलं सापडलं होतं. त्यातून आम्ही सिगरेट काढून प्यायलो."
advertisement
7/8
 "पण सिगरेट प्यायल्या नंतर दरदरून घाम फुटला, आम्ही घाबरलो. आता... भावनेच्या भरात हा बोललो आणि सिगरेट प्यायली. पण आता हाताचा वास कसा जाईल, साबण लावून बोटं चोळतोय. तोंडाचा वास घालवण्यासाठी दात घासतोय. मग लसणाची चटणी खाल्ली."
advertisement
8/8
 पुष्करने सांगितलं, "ही गोष्ट 1985 सालची आहे. त्यानंतर मला सिगरेट प्यायची सवय लागली. मग आम्ही जी सिगरेट लवपून प्यायचो ती खुलेआम प्यायला लागलो. आधी आम्ही सिगरेटचा वास लपवायचो नंतर आम्ही सिगरेटचा येईल हे बघायचो. आम्ही सिगरेट पिऊन शाळेत जायचो."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Actor : वर्गातील अटेडन्सआधी टपरीवर हजेरी, मराठी अभिनेता सुट्टा मारून जायचा शाळेत