मुलं वाढवणं अशक्यच! पालकत्वाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलली मृण्मयी देशपांडे, म्हणते 'एका फ्लॅटमध्ये नवरा, बायको...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Mrunmayee Deshpande : नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत मृण्मयीने आजच्या काळात मुलांना वाढवणं किती कठीण झालं आहे आणि एकत्र कुटुंब पद्धतीची आठवण किती येते, यावर अत्यंत महत्त्वाचं आणि थेट मत मांडलं आहे.
advertisement
1/7

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मृण्मयी देशपांडे तिच्या आगामी ‘मनाचे श्लोक’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या कामासोबतच मृण्मयी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बदलांमुळेही चर्चेत असते.
advertisement
2/7
नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत मृण्मयीने आजच्या काळात मुलांना वाढवणं किती कठीण झालं आहे आणि एकत्र कुटुंब पद्धतीची आठवण किती येते, यावर अत्यंत महत्त्वाचं आणि थेट मत मांडलं आहे.
advertisement
3/7
‘व्हायफळ’ पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत मृण्मयीने जुन्या आणि नवीन कुटुंब पद्धतीतील फरक स्पष्ट केला. ती म्हणाली, “मी माझ्या मित्रमंडळींना पाहिलं आहे. मुलांच्या एनर्जीला मॅच करणं आणि त्यांना वाढवणं खरंच अशक्य आहे!”
advertisement
4/7
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती आणि चाळ संस्कृती होती, तेव्हा मुलांची काळजी आणि संगोपन आपोआप व्हायचं. ती म्हणाली, “पूर्वीच्या काळी मुलं कुठे आणि कशी वाढायची हे कळायचंच नाही! कारण आजूबाजूला काका-आत्याची पोरं असायची, सगळे एकत्र राहायचे.”
advertisement
5/7
आजच्या सिंगल फॅमिलीत म्हणजेच एका फ्लॅटमध्ये नवरा, बायको आणि दोन मुलांना सगळं एकट्याने मॅनेज करावं लागतं, ज्यामुळे परिस्थिती खूप बिकट झाली आहे. ती म्हणाली, “ही तारेवरची कसरतच आहे!”
advertisement
6/7
मृण्मयीने पालकांना मिळणाऱ्या टीकेवरही पालकांची बाजू घेतली. “आजकाल मुलांना मोबाईल दिल्याबद्दल सगळे शिव्या देतात. अरे, पण आईबापाने हे गणित कसं सोडवायचं? त्यांना दोन मिनिटं कधी मिळणार?”
advertisement
7/7
ती म्हणाली की, पालक जे करत आहेत, ते बरोबर नाही हे त्यांनाही माहीत आहे, पण करणार काय? ही सगळी गणिते आहेत, ज्यात चूक किंवा बरोबरचं उत्तर देता येणार नाही. मृण्मयीचे हे वास्तववादी मत सध्या पालकवर्गात जोरदार चर्चेत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मुलं वाढवणं अशक्यच! पालकत्वाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलली मृण्मयी देशपांडे, म्हणते 'एका फ्लॅटमध्ये नवरा, बायको...'