TRENDING:

आधी भाजप अन् आता... रजनीकांतच्या फेमस हिरोईनने पक्ष बदलला, ती आहे कोण?

Last Updated:
सर्वत्र निवडणुकांचे वारे वाहत असताना एका प्रसिद्ध अभिनेत्री भाजपला रामराम केला असून एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या पक्षात प्रवेश केला आहे. कोण आहे ही अभिनेत्री?
advertisement
1/9
आधी भाजप अन् आता... रजनीकांतच्या फेमस हिरोईनने पक्ष बदलला, ती आहे कोण?
संपूर्ण देशात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. निवडणुकांच्या तोंडावर अनेक कलाकारांचे पक्ष प्रवेश होत आहेत. तर अनेक जण एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत. अशाच एका अभिनेत्री थेट भाजपला टाटा बाय बाय करत एक दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण?
advertisement
2/9
मधल्या काळात अनेक कलाकारांनी राजकारणात एन्ट्री घेतली. काहींनी त्यांचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. आपल्या वेगळा पक्ष स्थापन करणारा एक अभिनेता म्हणजे थलापति विजय. त्याने तमिळना विजय (TVK / थवेका) ही पार्टी स्थापन केली.
advertisement
3/9
तमिळनाडू विजय पार्टी (TVK / थवेका) मध्ये दिवसेंदिवस नव्या आणि महत्त्वाच्या व्यक्तींचा प्रवेश होत आहे. अलीकडेच पक्षाचे प्रमुख विजय यांच्या उपस्थितीत अनेक नामवंत व्यक्तींनी थवेका पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये रजनीकांतच्या चित्रपटात काम केलेली एक प्रसिद्ध अभिनेत्रीही सहभागी झाली आहे.
advertisement
4/9
तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री कामराज यांची नात मयूरी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी पनायूर येथील थवेका मुख्यालयात विजय यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. आज विविध पक्षांतील 50 हून अधिक लोकांनी अधिकृतपणे तमिळनाडू विजय पार्टीत प्रवेश केला आहे.
advertisement
5/9
यामध्ये कामराज यांची नात मयूरी, वेलू नाचियार कुटुंबातील सदस्य, दलित नेते एझिलमलाई यांची तिसरी कन्या, अरंगनाथन यांचे नातू, लेखक व अभिनेता वेला राममूर्ती यांचा मुलगा तसेच ओपीएस समर्थक राज मोहन यांचा समावेश आहे. याचबरोबर एक प्रसिद्ध अभिनेत्रीही थवेका पक्षात सहभागी झाली आहे.
advertisement
6/9
ही अभिनेत्री म्हणजे रंजना नाचियार. रंजनाने रजनीकांत यांच्याबरोबर अनेक चित्रपटात काम केलं आहे. तिनं 'थुप्परिवालान' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने 'इरुंबुथिराई', रजनीकांत यांच्याबरोबर ती 'अन्नाथे', 'डायरी', 'नडप्पे धुनी' यासारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका साकारल्या आहेत. तिने सूर्या यांचा 'एथक्कुम थुंधवन' आणि विजय सेतुपती यांचा 'थलैवन थलैवी' या चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. तसेच विजय टीव्ही प्रसिद्धीच्या सहकार्याने तिने एका चित्रपटाची निर्मिती केल्याचंही सांगितलं जातं.
advertisement
7/9
दिग्दर्शक बाला यांची पुतणी असलेल्या रंजना नाचियार हिनं आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपमध्ये प्रवेश करून केली होती. भाजपमध्ये राज्य सचिवपदासंदर्भात योग्य सन्मान मिळत नसल्याची तक्रार करत त्यांनी पक्ष सोडला. त्यानंतर त्या थवेका पक्षाच्या समर्थनार्थ विविध चर्चासत्रांमध्ये सहभागी होत होत्या. अखेर अभिनेता विजयच्या उपस्थितीत तिने अधिकृतपणे तमिळनाडू विजय पार्टीत प्रवेश केला.
advertisement
8/9
आपल्या अधिकृत वेबसाइटवर रंजनाने पोस्ट लिहिली आहे. त्यात तिनं लिहिलंय, "तमिळनाडू वेत्री पार्टीत अधिकृतपणे सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल अध्यक्ष विजय यांचे मनापासून आभार. या प्रवासात मला साथ दिल्याबद्दल महासचिव अन्नान आनंद यांचेही आभार. हा विलय नसून, राजकारणात महिलांचा आवाज बुलंद होण्याची सुरुवात आहे."
advertisement
9/9
2023 मध्ये रंजना नाचियार वादात सापडल्या होती . चेन्नईतील केरुगंबक्कम परिसरात सरकारी बसच्या पायऱ्यांवर लटकून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी अडवलं, त्यांना धमकावलं, जबरदस्तीने बसमधून उतरवलं आणि त्यांच्यावर हात उगारल्याचा आरोप झाला होता. यावेळी सरकारी बसच्या चालक व कंडक्टरशी वाद घातल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. नंतर तिची जामिनावर सुटका झाली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आधी भाजप अन् आता... रजनीकांतच्या फेमस हिरोईनने पक्ष बदलला, ती आहे कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल