TRENDING:

नागार्जूनची दुसरी पत्नी,जिच्या प्रेमात होते रजनीकांत; बायकोला डिवोर्सची नोटीसही पाठवली अन्...

Last Updated:
अभिनेते रजनीकांत हे अभिनेता नागार्जूनच्या दुसऱ्या बायकोच्या प्रेमात पडले होते. तिच्याशी लग्न करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या बायकोला डिवोर्स नोटीस पाठवली होती. नेमकं काय घडलं होतं?
advertisement
1/7
नागार्जूनच्या पत्नीसाठी रजनीकांत यांनी स्वत:च्या बायकोला पाठवलेली डिवोर्स नोटीस
इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अनेक कलाकारांची नावं अनेक अभिनेत्रींबरोबर जोडली जातात. साऊथचे सुपरस्टार रजनीकांतही यापासून दूर नाहीत. रजनीकांत यांनी इंडस्ट्रीला अनेक दमदार सिनेमे दिले. रजनीकांत यांचं करिअर नेहमीच प्रसिद्धीच्या शिखरावर राहिलं आहे.
advertisement
2/7
रजनीकांत यांच वैयक्तिक आयुष्या नेहमीच चर्चेत आलं. साऊथमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत त्यांचं नाव जोडलं गेलं होतं. पण तुम्हाला माहितीये का असं म्हटलं जातं की रजनीकांत नागार्जून यांच्या दुसऱ्या पत्नीसाठी आपल्या बायकोला डिवोर्स द्यायला तयार झाले होते.
advertisement
3/7
रजनीकांत आणि नागार्जून यांची दुसरी पत्नी अमालाबरोबर 'मप्पिलाई', 'कोडी परक्कुथु' और 'वेलाइक्करन' सारखे अनेक सिनेमे केले होते. 'वेलाइक्करन' सिनेमाच्या शूटींगदरम्यान रजनीकांत अमालाच्या प्रेमात पडले. ते अमालासाठी सेटवर तासंतास थांबायचे.
advertisement
4/7
दोघांचं नाव इतकं घट्ट झालं होतं की अमालासाठी रजनीकांत त्यांची पत्नी लताला डिवोर्स देण्याचा विचार करत होते. त्यांनी लताला डिवोर्स नोटीस पाठवल्याचंही बोललं जात. रजनीकांत यांच्या डिवोर्सच्या चर्चा समोर आल्या आणि चाहत्यांनी त्यांच्या सिनेमांवर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली.
advertisement
5/7
रजनीकांत यांच्या डिवोर्सचं प्रकरण दिवसेंदिवस वाढू लागलं. त्यानंतर त्यांची पत्नी लता हिनं फिल्ममेकर के. बालाचंदर यांच्याशी संपर्क साधला. रजनीकांत बालाचंदर यांना गुरू मानायचे.
advertisement
6/7
बालाचंदर यांनी संपूर्ण परिस्थिती हाताळली आणि याचा काय परिणाम होऊ शकतो हे सांगितलं. या निर्णयामुळे फक्त त्यांचा संसार नाही तर समाजातील त्यांच्या प्रतिष्ठेवरही किती मोठा परिणाम होऊ शकतो हे सांगितलं. बालाचंदर यांचं म्हणणं रजनीकांत यांना पटलं त्यांनी निर्णय मागे घेतला. त्यानंतर काही महिन्यांनी या चर्चा थांबल्या आणि सगळं पूर्ववत झालं.
advertisement
7/7
रजनीकांत आणि लता रंगाचारी यांची भेट कॉलेजमध्ये झाली होती. चेन्नईच्या एथिराज कॉलेजमध्ये लता इंग्रजी साहित्याचा अभ्यास करत होत्या. एकदा त्यांना रजनीकांत यांची मुलाखत घेण्यासाठी पाठवण्यात आलं. मुलाखतीत रजनीकांत यांनी लताला पाहिलं तेव्हाच त्यांनी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नागार्जूनची दुसरी पत्नी,जिच्या प्रेमात होते रजनीकांत; बायकोला डिवोर्सची नोटीसही पाठवली अन्...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल