TRENDING:

Actress Life: आजोबा, वडील आणि मुलगा, 3 पिढ्यांसोबत केलं काम, भरभरुन दिले रोमॅन्टिक सीन्स; कोण आहे ही अभिनेत्री?

Last Updated:
Actress Life: साऊथ ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री. जी तिच्या कामासोबत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत राहिली. बोल्ड आणि बिनधास्त ही अभिनेत्री कोण आहे?
advertisement
1/7
आजोबा, वडील आणि मुलगा, 3 पिढ्यांसोबत केलं काम; भरभरुन दिले रोमॅन्टिक सीन्स
साऊथ ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री. जी तिच्या कामासोबत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत राहिली. बोल्ड आणि बिनधास्त ही अभिनेत्री कोण आहे? तिच्याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/7
दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रम्या कृष्णन आहे. अनेक अभिनेत्रींचं करिअर दहा वर्षांत संपून जातं, पण रम्या कृष्णन जवळजवळ दोन दशके मुख्य नायिका म्हणून चमकली आहे.
advertisement
3/7
1984 मध्ये तेलुगू सिनेमातून पदार्पण केलेल्या रम्याला सुरुवातीपासूनच मोठ्या नायकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. चिरंजीवी, नागार्जुन, बालकृष्ण, वेंकटेश यांसारख्या दिग्गजांसोबत तिने ब्लॉकबस्टर चित्रपट केले. संकीर्तना, हॅलो ब्रदर, चंद्रलेखा, अन्नमय्या यांसारखे सुपरहिट चित्रपट तिच्या नावावर आहेत.
advertisement
4/7
बॉलिवूडमध्ये तिने 1993 च्या खलनायकमध्ये संजय दत्तसोबत दमदार कामगिरी केली. "नायक नहीं... खलनायक हूं मैं" या गाण्यामुळे ती विशेष चर्चेत आली होती. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड अशा विविध भाषांमध्ये रम्याने काम करून स्वतःला ‘पॅन-इंडिया’ स्टार म्हणून सिद्ध केलं.
advertisement
5/7
पण तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विक्रम म्हणजे तिने तीन पिढ्यांच्या नायकांसोबत काम केलं आहे. अक्किनेनी नागेश्वर राव यांच्यासोबत सूत्रधारू आणि इतर चित्रपट, त्यांचा मुलगा नागार्जुनसोबत दहा पेक्षा जास्त सुपरहिट चित्रपट, आणि नातवंड नागा चैतन्य व अखिल अक्किनेनीसोबतही महत्त्वाच्या भूमिका तिने केल्या आहेत.
advertisement
6/7
आजोबा, वडील आणि मुलगा या तिन्ही पिढ्यांच्या नायकांसोबत स्क्रीन शेअर करणारी ती दुर्मिळ अभिनेत्री ठरली आहे. आजही प्रेक्षक तिला बाहुबलीमधील शिवगामी देवी म्हणून आठवतात. तिचा तो कणखर आणि डोळ्यांतून जाळ ओकणारा अभिनय भारतीय सिनेमाच्या इतिहासात कायम लक्षात राहील.
advertisement
7/7
दरम्यान, रम्याने 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिची एकूण संपत्ती 2024 नुसार अंदाजे, सुमारे 40 ते 50 कोटी रुपये आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Actress Life: आजोबा, वडील आणि मुलगा, 3 पिढ्यांसोबत केलं काम, भरभरुन दिले रोमॅन्टिक सीन्स; कोण आहे ही अभिनेत्री?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल