TRENDING:

Mumbai Metro Update : मुंबईकरांसाठी गुड न्यूज, 2 मेट्रो मार्गिका सुरू होणार, या दिवशी लोकार्पण

Last Updated:

दसराच्या शुभमुहूर्तावर मुंबईकरांना दोन नव्या मेट्रो मार्गिकांचा दिलासा मिळू शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: दसराच्या शुभमुहूर्तावर मुंबईकरांना दोन नव्या मेट्रो मार्गिकांचा दिलासा मिळू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. यामध्ये मेट्रो 3 चा अंतिम टप्पा वरळी ते कफ परेड आणि मेट्रो 2 बी चा पहिला टप्पा यांचा समावेश आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता.
दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता.
advertisement

मेट्रो 3 ही 33.5 किमी लांबीची भूमिगत मार्गिका आहे. याचा पहिला टप्पा आरे ते बीकेसी सप्टेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर मे 2025 मध्ये बीकेसी ते वरळी हा दुसरा टप्पा सुरू झाला. आता अंतिम टप्पा वरळी ते कफ परेड पूर्णत्वास गेला असून मेट्रो रेल्वेच्या सुरक्षेसाठीचे आयुक्त (CMRS) यांच्याकडून चाचण्या घेण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर मार्गिका सुरू होण्यास अडथळा राहणार नाही.

advertisement

Pune Breaking News : आता फोना फोनी बंद! पुण्याच्या पीएमपीएल कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय

दुसरीकडे मेट्रो 2 बी ही 23.64 किमी लांबीची मार्गिका असून, यामध्ये एकूण 20 स्थानके आहेत. यातील पहिल्या टप्प्यात कुर्ला पूर्व, पूर्व द्रुतगती मार्ग, चेंबूर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल, मानखुर्द आणि मंडाळे डेपो ही स्थानके येतात. या मार्गिकेवर एप्रिल 15 रोजी पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्या वेळी काही तांत्रिक सूचना देण्यात आल्या होत्या. त्या पूर्ण करून आता CMRS कडून अंतिम चाचण्या घेतल्या जात आहेत.

advertisement

या दोन्ही मेट्रो मार्गिकांची कामे अंतिम टप्प्यात असून, चाचण्या यशस्वी झाल्यास दसऱ्याच्या शुभदिनी प्रवाशांसाठी सुरू करण्यात येऊ शकतात. यामुळे मुंबईतील प्रवास अधिक सुलभ व जलद होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro Update : मुंबईकरांसाठी गुड न्यूज, 2 मेट्रो मार्गिका सुरू होणार, या दिवशी लोकार्पण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल