Pune Rain Alert: तुफान आलंया! पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार, 5 जिल्ह्यांना इशारा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
मान्सूनच्या पश्चिम राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. यातच राज्यात पावसाने जोर धरला आहे.
advertisement
1/7

मान्सूनच्या पश्चिम राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. यातच राज्यात पावसाने जोर धरला आहे. आज सोमवार,15 सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 8.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानाचा पारा 29.2 अंश सेल्सिअसवर स्थिर राहिला. पुढील 24 तासात पुणे जिल्ह्यात तापमान स्थिर राहणार असले तरीही पुणे जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. सोमवारी पुणे घाटमाथ्यास जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
advertisement
3/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र पुढील 24 तास कोल्हापूर जिल्ह्यासाठी सतर्कतेचे ठरणार आहेत. आज कोल्हापूर जिल्ह्यात गडगडाटी वादळासह मध्यम पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. कोल्हापूरसह कोल्हापूर घाटमात्यास सतर्कतेचा यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
advertisement
4/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच 29.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात विजांसह पावसाची शक्यता आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 28 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके राहील. जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
5/7
सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात 14 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 30.2 अंश सेल्सिअस राहील. आज सातारा जिल्ह्यात विजांसह 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगवान वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सातारा घाटमाथ्यावर देखील मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
6/7
सोलापूर जिल्ह्यातील पारा उतरता होऊन मागील 24 तासात 30.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच 33 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात देखील जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
7/7
राज्यात ढगाळ वातावरण कायम आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पुढील 24 तास जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची सूचना हवामान विभागाने दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Rain Alert: तुफान आलंया! पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार, 5 जिल्ह्यांना इशारा