Rhea Chakraborty: रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात नव्या मिस्ट्री मॅनची एन्ट्री! सुशांत सिंह राजपूतनंतर अब्जाधीश बिजनेसमनच्या प्रेमात! कोण आहे तो?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rhea Chakraborty Relationship: आता रिया चक्रवर्ती तिच्या आयुष्यात पुढे सरकली असून, एका नवीन व्यक्तीसोबत तिचे नाव जोडले जात आहे. हा मिस्ट्री मॅन कोण आहे, तो काय करतो?
advertisement
1/9

मुंबई: अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यातील नाट्यमय घटनांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबतच्या तिच्या नात्यामुळे तिला २०२० नंतर अनेक संघर्षाला तोंड द्यावे लागले. कायदेशीर अडचणी, गंभीर आरोप आणि तुरुंगवास... रियाने खूप काही सहन केले.
advertisement
2/9
मात्र, आता रिया चक्रवर्ती तिच्या आयुष्यात पुढे सरकली असून, एका नवीन व्यक्तीसोबत तिचे नाव जोडले जात आहे. हा मिस्ट्री मॅन कोण आहे, तो काय करतो याबद्दल सविस्तर माहिती समोर आली आहे.
advertisement
3/9
२०१८-१९ मध्ये सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले होते. पण १४ जून २०२० रोजी सुशांतच्या निधनानंतर रियाच्या आयुष्यात मोठे वादळ आले.
advertisement
4/9
सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक कायदेशीर पेच निर्माण झाले, ज्यामुळे रियाला अनेक गंभीर आरोपांना सामोरे जावे लागले आणि तिला तब्बल २८ दिवस जेलमध्येही काढावे लागले.
advertisement
5/9
या सर्व परिस्थितीतून बाहेर पडून आता रिया सावरली आहे. विशेष म्हणजे, नुकतीच सीबीआयने तिला सुशांत सिंह राजपूत प्रकरणातून क्लीन चिट दिली आहे.
advertisement
6/9
सुशांतच्या निधनानंतर रियाचे नाव आता अब्जाधीश व्यावसायिक निखिल कामतसोबत जोडले जात आहे. हा मिस्ट्री मॅन दुसरा कोणी नसून अब्जाधीश उद्योजक निखिल कामत आहे.
advertisement
7/9
निखिल कामत हा भारतातील यशस्वी 'झिरोधा' या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा सह-संस्थापक आहे. निखिल आणि त्याचे भाऊ हे तरुण अब्जाधीश म्हणून ओळखले जातात.
advertisement
8/9
यावेळी रियाने लॅव्हेंडर रंगाची डेनिम पॅन्ट आणि क्रॉप्ड टॉप घातला होता. सोबत डेनिम जॅकेट आणि पोनीटेल असा तिचा कॅज्युअल लूक होता. तर निखिल कामत काळ्या रंगाचा टी-शर्ट, निळे शॉर्ट्स आणि पफर जॅकेट अशा साध्या लुकमध्ये होता.
advertisement
9/9
रिया आणि निखिल दोघेही आपल्या या नात्याबद्दल सार्वजनिकरित्या काहीही बोललेले नाहीत. पण दोघांना एकत्र बाईक राईडवर पाहिल्यानंतर त्यांच्यात नक्कीच काहीतरी खास आहे, अशा चर्चांना उधाण आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rhea Chakraborty: रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात नव्या मिस्ट्री मॅनची एन्ट्री! सुशांत सिंह राजपूतनंतर अब्जाधीश बिजनेसमनच्या प्रेमात! कोण आहे तो?